Home / News / Raja Raghuvanshi : सोनमच्या समोरच राजा रघुवंशीची हत्या! 5 जणांविरुद्ध आरोपपत्र

Raja Raghuvanshi : सोनमच्या समोरच राजा रघुवंशीची हत्या! 5 जणांविरुद्ध आरोपपत्र

Raja Killed in Front of Sonam

Raja Raghuvanshi Murdered in Front of Wife Sonam! Case Filed Against 5 Accused

Raja Killed in Front of Sonam – इंदूरचे उद्योजक राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi) यांची हत्या(Murdered) त्यांच्या पत्नी सोनमच्या (Wife Sonam)उपस्थितीत करण्यात आल्याचे खुलासा मेघालय पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. सोहरा उपविभागीय न्यायालयात दाखल केलेल्या या ७९० पानी आरोपपत्रात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल (Case Against 5 Accused) करण्यात आला आहे. यामध्ये सोनम रघुवंशी, तिचा कथित प्रियकर राज कुशवाह तसेच सुपारी घेणारे विशाल सिंह चौहान, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, राजा रघुवंशी यांची हत्या सोनमच्या उपस्थितीत करण्यात आली. आरोपी विशाल सिंह चौहानने पहिल्यांदा कुऱ्हाडीने राजावर हल्ला केला. हल्ल्यानंतर राजा वेदनेने तडफडू लागल्याने सोनम थोडावेळ घटनास्थळावरून पळून गेली. मात्र राजाचा मृत्यू झाल्यानंतरच ती परत आली. या प्रकरणात पोलिसांनी हत्या करण्यात वापरलेले हत्यार, रक्ताने माखलेले कपडे, हॉटेलमधील वस्तू, सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक गाईडसह अनेक साक्षीदारांचे जबाब हे महत्त्वाचे पुरावे म्हणून नोंदवले आहेत. याशिवाय, सोनमचे मंगळसूत्र आणि पायातील जोडवीही हॉटेलमधून जप्त करण्यात आली आहेत.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा – 

Viral News: दुबईत हरवला भारतीय यूट्यूबरचा फोन, पुढे काय झाले बघा

देशाला पुढील 8 वर्षांत मिळणार 8 नवे सरन्यायाधीश; इतिहासात पहिल्यांदाच महिला सरन्यायाधीश

पासपोर्ट रिन्यू करताय? चुकीमुळे अर्ज रद्द होऊ शकतो, लगेच वाचा या महत्त्वाच्या टिप्स