Rapido bike service approved in Thane despite opposition from auto drivers
मुंबई- ठाण्यातील रिक्षा चालकांनी रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे आमच्या उत्पन्नावर परिणाम होत(Rapido bike service Thane) असल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. हा दावा न्यायालयाने फेटाळून लावत अॅप आधारित या टॅक्सीमुळे तुमच्या मूलभूत अधिकारांवर कसा काय परिणाम होईल,(Auto rickshaw drivers protest Rapido)असा सवाल करत याचिकाकर्त्यांनाच जाब विचारला.(transport)
अॅप आधारित रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा दावा करत ठाण्यातील रिक्षा चालक अमरजित गुप्ता व अन्य काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका
दाखल केली आहे.या याचिकेवर न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या.नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.यावेळी याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला की, कायद्यानुसार, प्रादेशिक परिवहन कार्यालयात व्यावसायिक वाहने म्हणून नोंदणीकृत आणि पिवळी नंबर प्लेट असलेली वाहनेच टॅक्सी म्हणून चालवण्याची परवानगी आहे. असे असताना आम्ही रॅपिडो ऑप्लिकेशनद्वारे राईड्स बूक केल्या तेव्हा त्या बाईकला पांढऱ्या नंबर प्लेट होत्या. ही वाहने खासगी, गैर प्रवासी वाहतूक वाहने होती. यावर अतिरिक्त सरकारी वकील प्राची तटके यांनी म्हटले की अशा बेकायदेशीरपणे चालणार्या बाईक टॅक्सीविरूद्ध कारवाई केली जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत असल्याचे दिसताच याचिकाकर्त्यांनी आपली याचिका मागे घेत असल्याचे न्यायालयाला सांगितले.(Thane traffic and transport updates)
या सुनावणीवेळी खंडपीठाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले. खंडपीठ म्हणाले की, अॅप आधारित बाईकमुळे तुमच्या उत्पन्नावर कसा काय परीणाम होणार?उद्या तुम्ही म्हणाल टॅक्सी चालवू नका,मेट्रो चालवू नका,रस्त्यावर टॅक्सीचालक, रिक्षाचालक ग्राहकांना कशी वागणूक देतात, त्यांची भाषा,उद्धटपणा हे सर्वानी पाहिले आहे. प्रत्येकाला त्याचा अनुभव येत असतो. दरवर्षी कितीतरी टॅक्सी बाजारात येतात. त्यांच्यात जे काही बेकायदेशीर असेल त्यावर सरकार निर्णय घेईल.