Home / News / Rapido Controversy जाहिरात दिशाभूल रॅपिडोला दंड

Rapido Controversy जाहिरात दिशाभूल रॅपिडोला दंड

Rapido fined for misleading advertisement

Rapido fined for misleading advertisement

नवी दिल्ली – बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या राइड-हेलिंग कंपनीला (Rapido) केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) १० लाख रुपयांचा दंड ठोठावला. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकाशित (misleading ads India)केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली. याशिवाय ग्राहकांना पैसे परत करण्याचे आणि संबंधित जाहिरात तात्काळ काढून टाकण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले.(transport app)

कारवाई झालेल्या जाहिरातीत रॅपिडोने दावा केला होता की,(Rapido controversy
) त्यांची कंपनी ५ मिनिटांत सेवा पुरवेल अथवा ग्राहकांना ५० रुपये कॅशबॅक देईल. त्याचबरोबर इतर काही सेवांचीही आश्वासने देण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. गेल्या दोन वर्षांत, सुमारे १८०० वापरकर्त्यांनी रॅपिडोने त्यांचे आश्वासन पूर्ण न केल्याच्या तक्रारी दाखल केल्या. रॅपिडोने देशभरातील १२० शहरांमध्ये ५४८ दिवस वेगवेगळ्या भाषांमध्ये अशा जाहिराती चालवल्या. रॅपिडोने या जाहिराती जाणीवपूर्वक चालवल्याचे सीसीपीएला तपासात आढळले. त्यांनी दिलेला ५० रुपयांचा कॅशबॅक रोख स्वरूपात देण्यात आला नाही. त्याऐवजी कंपनीने ‘रॅपिडो कॉइन्स’ दिले, ही नाणी फक्त बाईक राईडसाठीच वापरावी लागतात . तेही फक्त ७ दिवसांसाठी वैध असते आणि त्यात अनेक अटी होत्या. यामुळे त्यांचे मूल्य कमी झाले. असे करून रॅपिडोने ग्राहकांना त्यांची सेवा वारंवार वापरण्यास भाग पाडले, असा आरोप सीसीपीएने केला.