Raut Slams Fadnavis Over Pakistan Cricket Remarks
मुंबई – पाकिस्तानविरोधात क्रिकेट खेळण्याबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Sanjay Raut slams Fadnavis) यांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद मातोश्रीवर आल्याची आठवण करून उबाठाचे डोके चोरीला गेले आहे, असा टोला लगावला होता. यावरून उबाठा खासदार संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर देते म्हटले की, भाजपाच्या गुडघ्यातसुद्धा मेंदू नाही. सगळा भाजपा अर्धवटज्ञानी आहे.
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस(CM Fadanvi) हे अर्धज्ञानी आहेत आणि मुळात संपूर्ण भाजपाच अर्धवट ज्ञानी आहे. भाजपाच्या गुडघ्यातसुद्धा मेंदू नाही. (BJP hypocrisy allegation)त्यांनी मी बनवलेला ठाकरे चित्रपट त्यांनी पाहावा. त्या काळातील बाळासाहेबांच्या मुलाखती वाचाव्यात. एकवचनी या पुस्तकात बाळासाहेबांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. दिलीप वेंगसरकर जावेद मियांदादला घेऊन मातोश्रीवर आले होते आणि भारत–पाकिस्तान क्रिकेट पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. मात्र बाळासाहेबांनी (Bal Thackeray Pakistan stand)स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही. काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात थांबत नाही, तोपर्यंत पाकसोबत क्रिकेट खेळण्याला परवानगी नाही. फडणवीस, तुमच्या नरेंद्र मोदींसारखे बाळासाहेबांनी पाकिस्तान, चीन किंवा ट्रम्पसमोर शेपूट घातले नाही. ऑपरेशन सिंधूरच्या वेळी मोदी म्हणाले होते की रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही. मग आता क्रिकेट कसे चालते? पाकिस्तानसमोर भाजपाने पैशासाठी शेपूट घातले आहे. तुम्ही कुणाची तरफदारी करत आहात? भाजपा ही खोटेपणाची कंपनी आहे. स्वत:चे बोला, जुन्या गोष्टी उकरून काढू नका.