Ravindra Dhangekar v/s Chandrakant Patil – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री भाजपाचे चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ता समीर पाटीलकडून मिळालेल्या नोटीसीवरून शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे.
पाटील यांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर इंग्रजीत नोटीस पाठविण्याच्या इतके हुशार असतील तर मला चंद्रकांत पाटील यांचा सल्ला घ्यावा लागेल असा टोला धंगेकरांनी लगावला.
काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदार संघात कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीच्या दहशतीवरून पाटील यांना लक्ष्य केले. घायवळ प्रकरणावर चंद्रकांत पाटील गप्प का ? समीर पाटील कोण ?
असा सवाल धंगेकर यांनी केला. त्यानंतर समीर पाटील यांनी पुरावे न देता गंभीर आरोप केल्याचा दावा करत धंगेकरांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली.
यावर रवींद्र धंगेकर म्हणाले की, समीर पाटील हा चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता आहे. मी निलेश घायवळ प्रकरणावर बोलल्यामुळे माझ्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले. आता समीर पाटील यांनी मला काल रात्री नोटीस पाठवली आहे.
ती नोटीस इंग्रजीमध्ये आहे, माझे इंग्रजी कच्चे असल्याने मी वकिलांशी चर्चा करणार आहे. अनेक वकील माझ्या पाठीशी उभे आहेत. मी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात नाही, पण फक्त विचारतो की समीर पाटील कोण आहे? गुन्हे करणारे लोक तुमच्या ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कसे काम करत आहेत?
हे देखील वाचा –
वादानंतर ‘मनाचे श्लोक’ सिनेमाचं नावं बदलले! मृण्मयी देशपांडेचा चित्रपट आता ‘या’ तारखेला होणार रिलीज