RCF Project – रायगड (Raigad) जिल्ह्यातील थळ-वायशेत येथील आरसीएफ (Rashtriya Chemicals and Fertilizers) प्रकल्पग्रस्तांनी काल रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यावर आज सकाळपासून साखळी उपोषण (Hunger Strike)सुरू केले आहे. हे उपोषण १७ तारखेपर्यंत सुरू राहणार असून तोपर्यंत प्रकल्पग्रस्त वारसांना नोकरीत सामावून न घेतल्यास आणखी आक्रमक आंदोलन केले जाई, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
आरसीएफ प्रकल्पग्रस्तांनी काल कंपनीच्या गेटसमोर जमून केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. प्रकल्पग्रस्तांनी वाहतूक रोखून धरली. रस्त्यावर टायर जाळले. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांवर (cases against protesters)गुन्हे दाखल केले आहेत.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अलिबागचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (MLA Mahendra Dalvi)म्हणाले की, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझरच्या आडमुठ्या धोरणामुळेच प्रकल्पग्रस्तांना आंदोलन करावे लागले. हा प्रकल्प थळ-वायशेत येथे १९८० मध्ये सुरू झाला. त्यासाठी आजूबाजूच्या गावांतील लोकांनी जमीन दिली. त्यांना जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. काही प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या मिळाल्या. मात्र काही प्रकल्पग्रस्तांना वंचित ठेवण्यात आले. आज प्रकल्पाला ४५ वर्षे झाली तरी हा प्रश्न अजून सुटलेला नाही. एकूण १४१ प्रकल्पग्रस्तांचे वारस वा कुटुंबीय अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मध्यंतरी ते कोर्टात गेले. कोर्टानेही प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने निकाल दिला.
त्यानंतरही त्यांना नोकरीवर घेण्यात आलेले नाही. सध्या या प्रकल्पाचा विस्तार चालू आहे. त्यालाही प्रकल्पग्रस्तांनी अनुमती दिली आहे. हे विस्ताराचे काम सुरू केल्यावर उर्वरित प्रकल्पग्रस्तांना नोकरीत घेऊ, असे आश्वासन आरसीएफने पुन्हा एकदा दिले होते. परंतु त्याचेही पालन केले नाही. कायद्यानुसार या लोकांना कामावर बंधनकारक आहे. प्रकल्पग्रस्तांनी कंपनीला जमीन देताना केलेल्या करारातही हे नमूद आहे.
मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. तसेच त्यांच्या मध्यस्थीने संबंधीत खात्याचे केंद्रिय मंत्री जे. पी. नड्डा (J.P. Nadda.)यांच्याही कानावर हे प्रकरण घातले आहे. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. तरीही प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्ही हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनानंतरही कंपनीने निर्णय घेतला नाही तर आम्ही काळी दिवाळी (Black Diwali)साजरी करू आणि कायद्याच्या चौकटीत राहून अधिक आक्रमक आंदोलन करू.
हे देखील वाचा –
क्रिकेट सामन्यावेळी नकार ! मात्र हाॅकीत भारत पाक खेळाडूंचे हस्तांदोलन
चंद्रकांत पाटलांचा सल्ला घ्यावा लागेल ! रवींद्र धंगेकरांचा टोला
बाबासाहेब पाटलांचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा ! इंद्रनील नाईक नवे पालकमंत्री