Home / महाराष्ट्र / Coastal Road : कोस्टल रोड सुशोभिकरणासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजची निवड

Coastal Road : कोस्टल रोड सुशोभिकरणासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजची निवड

Coastal Road

Coastal Road : मुंबईतील महत्वाकांक्षी कोस्टल रोडलगतच्या ५३ हेक्टरच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC)नुकतेच उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) निवड केल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

छोटी-छोटी उद्याने, जलाशय, सायकलस्वारी, पायी फेरफटका मारण्यासाठी मार्गिका आणि विविध जातीची वृक्षराई असे स्वरुप असलेल्या या सुशोभिकरण प्रकल्पावर अंदाजे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.


या प्रकल्पासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजशी करार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.करार झाल्यानंतर रिलायन्स कंपनी या संपूर्ण सुशोभिकरणाचा आराखडा, त्यामध्ये लावली जाणारी झाडे आदिंचा संपूर्ण तपशिल पालिकेला सादर करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अंदाजे दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे,अशी माहिती कोस्टल रोडशी संबंधित एका पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.


या प्रकल्पासोबतच कोस्टल रोड लगतच्या साडेपाच किलोमीटर लांबीच्या उद्यानाची निर्मिती सध्या पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. हे उद्यान पूर्ण झाल्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी रिलायन्स फाउंडेशन घेणार आहे. सामाजिक दायित्व म्हणून कंपनी या उद्यानाची देखभाल करणार आहे. या संपूर्ण सुशोभिकरण प्रकल्पासाठी पालिकेने देकारपत्र मागवली होती. त्याला फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजने प्रतिसाद दिला. त्यामुळे या प्रकल्पाचे कंत्राट रिलायन्सलाच देण्यात आले.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

शिंदेंकडून फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आंदोलकांना मदत ! खा. संजय राऊतांची टीका

Mandal Yatra: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मंडल यात्रा तात्पुरती स्थगित

बाप्पा पावला! गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय; दुधाच्या खरेदी दरात वाढ