Home / News / Kolhapur flood अर्ध्या तासात रस्त्यावर अवतरल्या नद्या

Kolhapur flood अर्ध्या तासात रस्त्यावर अवतरल्या नद्या

कोल्हापूर – काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहरामध्ये अचानकपणे ढगांच्या गडगडासह पावसाने प्रचंड प्रमाणात हजेरी लावली.ढगफुटी सदृश कोसळलेल्या पावसामुळे नाले, गटारे...

By: Team Navakal
Rivers flooded the roads in Kolhapur in half an hour

कोल्हापूर – काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शहरामध्ये अचानकपणे ढगांच्या गडगडासह पावसाने प्रचंड प्रमाणात हजेरी लावली.ढगफुटी सदृश कोसळलेल्या पावसामुळे नाले, गटारे तुडुंब भरून गेली. अवघ्या अर्ध्या तासात शहरातील रस्त्यांवर जणू नद्या अवतरल्या होत्या.Kolhapur flood

सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक काळोख पसरला. ढगांच्या गडगडासह विजा चमकू लागल्या अन् जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानकच ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने विक्रेत्यासह, नागरिकांची तारांबळ उडाली. अर्ध्या तासातच शहरातील रस्त्यावर पाणी साचले होते.पावसाचा जोर असल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. सरनोबतवाडी ते मणेरमाळ दरम्यान असलेल्या ओढ्यात शाळकरी मुलगा वाहून गेला. पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.शोध मोहिम उशिरापर्यंत सुरु होतो.यावेळी या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.हवामान खात्याने पुढील पाच दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषत: शनिवार १४ ते सोमवार १६ जून ह्या तीन दिवसांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या