Sabase bada Jumlebaaz ! Congress Releases Gemini AI Video Targeting Modi
Sabase bada Jumlebaaz Modi’s AI Video – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या जुन्या आश्वासनांची उजळणी करत काँग्रेसने (Congress)सबसे बडा जुमलेबाज या शीर्षकांतर्गत जेमिनी एआय (Gemini AI)तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेला व्हिडिओ पोस्ट केला.
या व्हिडिओत पंतप्रधान मोदींच्या घोषणांवर उपरोधिक टीका करून त्याचा प्रत्यक्ष परिणामांचेी दृश्य दाखवले आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये २०१४ पासून मोदींनी केलेली आश्वासने आणि वास्तव यांचे चित्र दाखवले आहे. उदाहरणार्थ, गॅस सिलिंडर ६०० रुपयांचा करू, या वचनासोबत एका महिलेला ११०० रुपये किंमत असलेल्या सिलिंडरसमोर मान खाली चिंतेत बसलेली असल्याचे दाखवले आहे.
हवाई चप्पल घालणारी व्यक्ती हवाई जहाजात (विमानात) दिसला पाहिजे या वक्तव्यावर एक चप्पल शिवणारा कामगार दाखवला आहे.
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू या आश्वासनासोबत एक हताश शेतकरी डोक्याला हात लावून बसलेला दिसतो. त्याचप्रमाणे, काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन, महागाई नियंत्रणाचे वचन आणि सामान्य जनतेच्या खात्यात १५-२० लाख जमा करण्याचे दावेही दाखवले आहेत.
याच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला गरीब कुटुंब तर दुसऱ्या बाजूला गौतम अदानींच्या प्रतिकृतीशी मोदींच्याआलिंगनाचे चित्र व्हिडिओमध्ये दिसते. व्हिडिओच्या शेवटी जुमले लेलो जुमले जी हे गीत व मोदींच्या विविध क्लिप्स एकत्र करून उपरोधात्मक शैलीत दाखवल्या आहेत.
हे देखील वाचा –
मतदार यादी पुनर्परिक्षण ३० सप्टेंबरपर्यंत तयारी करा ! निवडणूक आयोगाचे निर्देश