Home / News / १ सप्टेंबरपासून सांगली महापालिकेचे कामकाज ऑनलाइन

१ सप्टेंबरपासून सांगली महापालिकेचे कामकाज ऑनलाइन

Sangli Municipal Corporation's operations will go online

Sangli Municipal Corporation’s operations will go online from September 1.

Sanagli MNC Digitalisation – येत्या १ सप्टेंबरपासून सांगली महापालिकेच्या सर्व विभागांचे कामकाज ऑनलाईन (Sangli Municipal Corporation)होणार आहे. कामकाजाच्या सर्व फाईल आयुक्तांकडे थेट ऑनलाईन मंजुरीसाठी जाणार आहेत. ‘ई-ऑफिस’ (E-Office)या आधुनिक प्रणालीतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे,अशी माहिती पालिका आयुक्त सत्यम गांधी(Satyam Gandhi) यांनी दिली.

आयुक्त सत्यम गांधी म्हणाले की, नव्या डिजिटल(digital) प्रणालीमुळे फायलींचा एका टेबलावरून दुसर्‍या टेबलावर होणारा त्रासदायक प्रवास थांबणार आहे.पालिकेत आजवर कोणतीही परवानगी अथवा प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी फाइल हाती घेऊन कर्मचार्‍यांना एका विभागातून दुसर्‍या विभागात जावे लागत असे.त्यामुळे वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. त्याचप्रमाणे पारदर्शकतेच्या अभावामुळे नागरिकांच्या तक्रारीही वाढत होत्या. नवीन प्रणालीत फायली थेट संगणकावरून संबंधित अधिकार्‍यांकडे पोहोचतील.मंजुरी किंवा आक्षेप नोंदविण्याची प्रक्रियादेखील ऑनलाईन होणार आहे.त्यामुळे कामकाजात वेग येणार असून.फाइल अडकवण्याचे प्रकार टळतील.अद्ययावत ऑनलाईन प्रणालीमधून टपाल,नस्ती,मंजुरी, आदेश,परिपत्रके डिजिटलमध्येच विभाग प्रमुखांमार्फत मान्यतेस सादर होतील.त्यावर स्वाक्षरीदेखील डिजिटल असेल.कार्यालयामधील फाइल, टपाल यांचा प्रवास कोणत्याही वेळी ऑनलाईन समजेल, कोणत्या विभागाकडे किती फाइल,किती दिवस प्रलंबित आहेत याचा अहवाल वरिष्ठांकडे प्राप्त होतील.यासाठी पालिकेला काहीही खर्च आलेला नाही.


 ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

ॲपल धमाका करणार! लवकरच लाँच करणार पहिला फोल्डेबल आयफोन; फीचर्स-किंमतीविषयी जाणून घ्या

अथर्व सुदामेच्या रीलमुळे वाद; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणाऱ्या व्हिडिओवरून सोशल मीडियावर टीका

“दबाव कितीही आला तरी…”, अमेरिकेच्या आयात शुल्कावर पीएम मोदींचा थेट इशारा