Home / News / Sanjay Raut Named Star Campaigner : सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले खा. राऊत स्टार प्रचारक

Sanjay Raut Named Star Campaigner : सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले खा. राऊत स्टार प्रचारक

Sanjay Raut Named Star Campaigner – राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचारासाठी उबाठाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे....

By: Team Navakal
Sanjay Raut
Social + WhatsApp CTA

Sanjay Raut Named Star Campaigner – राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचारासाठी उबाठाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, आजारपणामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेणारे खासदार संजय राऊत यांचेदेखील नाव या यादीत आहे.

दररोज माध्यमांशी संवाद साधणारे उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ३१ ऑक्टोबर रोजी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहून कळवले होते की, त्यांच्या प्रकृतीत अचानक काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाला आहे.

वैद्यकीय उपचार सुरू असून बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर डॉक्टरांनी निर्बंध घातले आहेत. ते ठणठणीत बरा होऊन साधारणत: नवीन वर्षात त्यांच्या भेटीला येतील.

हे पत्र लिहिल्यापासून राऊत सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. पण स्टार प्रचारकांच्या यादीत त्याचे नाव असल्याने प्रत्यक्ष मैदानात उतरून नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात करतील का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.


हे देखील वाचा –

ईशान्येकडील एनपीपी पक्षाचा राज्याच्या राजकारणात प्रवेश

वर्षाताई तोंडाला आवर घाला! संदीप देशपांडेंचा खोचक टोला

नवी मुंबई विमानतळ टेक-ऑफ साठी सज्ज! तिकीट बुकिंग सुरू होणार, पहिली फ्लाईट या तारखेला उड्डाण घेणार

Web Title:
संबंधित बातम्या