Home / News / SC Rejects SIT Probe Plea : मतचोरीच्या एसआयटी चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SC Rejects SIT Probe Plea : मतचोरीच्या एसआयटी चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

SC Rejects SIT Probe Plea -, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी...

By: Team Navakal
Supreme Court
Social + WhatsApp CTA


SC Rejects SIT Probe Plea -, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.


राहुल गांधी काही दिवसांपूर्वी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमधील सेंट्रल बंगळुरु लोकसभा मतदार संघातील महादेवपुरा येथील मतदार याद्यांमधील घोळ उघड केला होता.

बोगस मतदार नोंदणी, मतदाराच्या संमतीशिवाय यादीतून नावे वगळणे, एकाच मतदाराची वेगवेगळ्या याद्यांमध्ये, एकापेक्षा अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी नोंदणी, एका पत्त्यावर शेकडो मतदारांची नोंद करणे आदी गैरप्रकार राहुल गांधी यांनी उघड केले होते.
राहुल गांधींच्या या आरोपांमुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाला होता.

या गैरप्रकारांमुळे देशाच्या राज्यघटनेतील अनुच्छेद ३२४ व ३२५ चा तसेच कलम १४ व २१ चा भंग होतो. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे,असे म्हणत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली होती.


न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर आज या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्याने पडताळणीसाठी अन्य मार्गांचा अवलंब करावा, असे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळली.


हे देखील वाचा –

काँग्रेसला सोबत घेण्यास राज ठाकरेच इच्छूक! राऊत यांचे वक्तव्य

डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा घुमजाव क्षी जिनपिंग यांची प्रशंसा केली

BMC निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी घोषणा! Gen Z तरुणांना थेट निर्णयप्रक्रियेत सामील करण्यासाठी इंटर्नशिप कार्यक्रम

Web Title:
संबंधित बातम्या