SC Slams States on Stray Dogs – भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर काय उपाययोजना केल्या याची माहिती देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांना चांगलेच फटकारले.तुम्ही न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत आहात,अशा शब्दात न्यायालयाने खडे बोल सुनावले.
देशात सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भटक्या कुत्र्यांकडून माणसांवर आणि विशेषतः लहान मुलांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.याची स्वतःहून दखल घेत न्यायालयाने याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर न्या. विक्रम नाथ आणि न्या.संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याबाबत आखून दिलेल्या नियमांनुसार उपाययोजना करून त्याची माहिती न्यायालयात सादर करा असे आदेश २२ ऑगस्ट रोजी खंडपीठाने दिले होते.
मात्र अनेक राज्यांनी अद्याप न्यायालयात शपथपत्रावर ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे संतप्त होत न्यायालयाने ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांनी व्यक्तिशः उपस्थित राहिलेच पाहिजे,असे ठणकावून सांगितले.
हे देखील वाचा –
पश्चिम रेल्वेवर रविवारी पाच तासांचा जम्बो ब्लॉक..
तालिबानशी झालेल्या अयशस्वी चर्चेसाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार धरले..
संजय राऊतांना गंभीर आजाराची लागण; दोन महिने सार्वजनिक जीवनाला ब्रेक..
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								








