पाटणच्या सोसायटी निवडणुकीत शंभूराज देसाईंना धक्का

Setback for Shambhuraj Desai in Patan Society Elections

Setback for Shambhuraj Desai in Patan Society Elections


ढेबेवाढी – पाटण Patan society elections तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपात BJP प्रवेश केल्यानंतर तालुक्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.पाटणकरांच्या भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या दिवशी बुद्रुक गावच्या सोसायटी निवडणुकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवून शंभूराज देसाई गटाला धक्का दिला आहे. Setback for Minister Shmabhuraj Desai

दिवशी बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १२ जागांसाठी मतदान झाले.या निवडणुकीत पाटणकर गटाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी सरासरी ३५ ते ४० मताधिक्याच्या फरकाने देसाई गटाच्या सर्व उमेदवारांचा पराभव केला.भाजपच्या पाटणकर गटाच्या श्री पावणाई देवी ग्रामविकास पॅनेलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी विजयश्री खेचून आणून सोसायटीवरील आपले वर्चस्व अबाधित ठेवले. भटक्या जमाती प्रवर्गातील देसाई गटाचा एक उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आला आहे.विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी करत व गुलालाची उधळण करत भर पावसात मोठा जल्लोष केला.गेल्या महिनाभरापासून या पंचवार्षिक निवडणुकीमुळे दिवशी बुद्रुक गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. त्यातच सत्यजितसिंह पाटणकर यांनी शरद पवारांची राष्ट्रवादी सोडून थेट भाजपात उडी मारली.त्यामुळे तालुक्यातील राजकिय चित्रच पालटले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले होते.पाटणकर गटाने तालुक्यातील बदललेल्या राजकीय वाटचालीत पहिलीच बाजी मारली आहे. यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री शंभूराज देसाई यांच्या राजकिय कसोटीचा काळ सुरू झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.