Home / News / Shinde Ends Hotel Politics : शिंदे गटाची माघार! हॉटेल मुक्काम सोडला मात्र तणाव कायम! भाजपावर उमेदवार पाडल्याचा आरोप

Shinde Ends Hotel Politics : शिंदे गटाची माघार! हॉटेल मुक्काम सोडला मात्र तणाव कायम! भाजपावर उमेदवार पाडल्याचा आरोप

Shinde Ends Hotel Politics – मुंबईचे महापौरपद आपल्याच पक्षाला हवे असा अट्टाहास करत भाजपा आणि शिंदे गट यांच्यात गेले काही...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA


Shinde Ends Hotel Politics – मुंबईचे महापौरपद आपल्याच पक्षाला हवे असा अट्टाहास करत भाजपा आणि शिंदे गट यांच्यात गेले काही दिवस वाद सुरू असून, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्वच्या सर्व 29 नगरसेवकांना 4 दिवस पंचतारांकीत ताज लॅण्ड एण्ड हॉटेलमध्ये डांबून ठेवले होते.

मात्र आज भाजपाने संताप व्यक्त करीत एकनाथ शिंदे यांना धारेवर धरल्यानंतर या नगरसेवकांना हॉटेलमधून सोडून देण्यात आले. भाजपाच्या दिल्लीच्या नेत्यांनी आज स्पष्ट केले की, महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. फडणवीस यांनीही शिंदे यांना थेट निरोप पाठवला की, नगरसेवकांना हॉटेलात डांबून ठेवणे योग्य दिसत नाही. यामुळे एकनाथ शिंदे यांनी आज दोन पावले माघार घेतली.

मात्र त्यानंतरही अजून वाद निवळलेला नाही. आम्ही 135 ऐवजी 150 च्यावर जागांवर निवडणूक लढलो असतो तर तुमची गरज भासली नसती, असे भाजपा नेत्यांनी सुनावले. त्यावर शिंदे गटाने प्रत्युत्तर देत आम्हाला मुस्लीम बहुल मतदारसंघ मुद्दाम दिले गेले. आमच्या उमेदवारांना भाजपाने मुद्दाम पाडले, असे आरोप केले. याचा शेवट कसा होतो हे 22 जानेवारीला महापौर आरक्षण लॉटरी निघाल्यानंतरच कळेल.


भाजपाने आज शिंदे सेनेला जाबच विचारला. त्यांनी म्हटले की, शिंदे सेनेला भाजपाने 90 जागा सोडल्या. त्यापैकी शिंदे सेनेचे फक्त 29 नगरसेवकच निवडून आले. याउलट भाजपाने 135 जागांमधून 89 जागा निवडून आल्या. आम्ही 135 जागांऐवजी 150 जागा लढलो असतो तर आमचे आणखी नगरसेवक निवडून आले असते. शिंदे सेनेच्या अपयशामुळे महायुतीचा स्ट्राईकरेट कमी झाला आहे.

त्यांच्या या आरोपामुळे शिंदे सेनेचे नेते संतप्त झाले आहेत आणि भाजपाला प्रत्युत्तर देत ते म्हणाले की, शिंदे सेनेला जागा सोडताना मुद्दाम मुस्लीम बहुल प्रभाग देण्यात आले. इतकेच नव्हे तर मुंबईत 11 ठिकाणी भाजपामुळेच शिंदे सेनेचे उमेदवार पराभूत झाले. भाजपाने या उमेदवारांना कोणतीही मदत केली नाही. शिंदे सेनेचे जे किरकोळ मताने उमेदवार पराभूत झाले त्यात प्रामुख्याने मनाली भंडारी (प्रभाग 32) यांचा अवघ्या 84 मतांनी पराभव झाला.

अश्विनी हंडे (प्रभाग 128) यांचा फक्त 158 मतांनी पराभव झाला. समाधान सरवणकर यांचा 603 मतांनी पराभव झाला. प्रिया पाटील (प्रभाग 223) यांचा 476 मतांनी पराभव झाला. सुप्रिया मोरे (प्रभाग 201) यांना 530 मतांनी अपयश आले. मानसी पाटील या 596 मतांनी पराभूत झाल्या. प्रभाग 191 मध्ये शिंदे सेनेच्या प्रिया सरवणकर हिचा माजी महापौर विशाखा राऊत यांनी 197 मतांनी पराभव केला.
शिंदे सेनेचे पराभूत उमेदवार समाधान सरवणकर यांनी 11 प्रभागांत शिंदे सेनेचे उमेदवार किरकोळ फरकाने पराभूत झाल्याचे सांगितले.

ते म्हणाले की, माझ्या प्रभागात भाजपाचे चार-पाच आमदार प्रचार करत होते. दोन पक्ष प्रमुखांची मुले माझ्या मतदारसंघात प्रचार करत होती. त्यांचे टार्गेट मी होतो, तरी मतदार माझ्यासोबत उभे राहिले. माहीम विधानसभेत मला भाजपाची मदत झाली नाही. भाजपाचे विशिष्ट पदाधिकारी होते, त्यांनी सर्वांना सांगितले की, समाधानला मदत करू नका. सोशल मीडियावर सांगितले जात होते की, आपल्याला मेसेज आलेला आहे. त्यामुळे कोणी आम्हाला माहीममध्ये मदत केली नाही. आपल्याला समाधान सरवणकर यांचे काम करायचे नाही, आपल्याला त्यांचा पराभव करायचा आहे, असा संदेश फिरत होता. शिंदे सेना आणि भाजपा यांच्यात आज दिवसभर
आरोप-प्रत्यारोप सुरू होते.


दरम्यान, आज सकाळीच शिंदे सेनेच्या सर्व 29 नगरसेवकांनी ताज लॅण्ड एण्ड हॉटेल सोडले. त्यांच्याकडील सर्व कागदपत्रे शिंदेंच्या शिलेदारांनी आधीच ताब्यात घेतली होती. या नगरसेवकांना आज येथून कोकण भवनला नेण्यात येणार होते. मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यामुळे नगरसेवकांना पुढील योजना काय आहे याची कोणतीच माहिती नव्हती. काल आमची बैठक घेऊन नगरसेवक कामाबाबत माहिती दिली आणि आज आम्हाला जायला सांगितले आहे, एवढेच उत्तर हे नगरसेवक देत होते. मुख्यमंत्री फडणवीस 23 जानेवारीला महाराष्ट्रात परतत आहेत. त्याआधी 22 जानेवारीला महापौर आरक्षण जाहीर होईल. यामुळे 23 जानेवारीनंतरच वेगवान घडामोडी घडत मुंबईच्या महापौरपदाचा अखेर
निर्णय लागेल.


हे देखील वाचा –

Web Title:
संबंधित बातम्या