Shinde Slams ‘Rehman Dacoits – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेवर वर्षानुवर्षे डाका टाकणाऱ्यांना रेहमान डकैत म्हणत टीका केली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच खरी धुरंधर ठरेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यातील प्रस्तावावर उत्तर देताना शिंदे यांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही विकासकामांचा आणि कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांना मात्र बिनबुडाचे आरोप करण्यावाचून काहीही काम शिल्लक राहिलेले नाही. विरोधक अधिवेशात आले , पण एकही प्रश्न विचारला नाही.
त्यामुळे जनतेच्या प्रश्नाबाबत ते किती जागरूक आहेत ते समजते. लोकांचे प्रश्न सोडून फक्त विरोधी पक्षनेतेपद द्या यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू होता. मात्र जनतेनेच तुम्हाला विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवले आहे.
मुंबईकरांसाठी आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले. मुंबईतील ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना दिलासा दिला, १३ हजार इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. नॅशनल पार्क मधील २५ हजार कर्मचाऱ्यांना ५किमी परिसरात पर्यायी घरे देण्याची योजना आणली, गिरण्यांच्या जागेवरील चाळींच्या पुनर्विकासासाठी नियमावलीमध्ये बदल केले, सिडकोचा घरांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी केल्या, ५० एकरापेक्षा मोठ्या भूखंडावर क्लस्टर पुनर्विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतला.
यामध्ये पहिल्या टप्यात १७ प्रकल्पांची निवड झाली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ४० लक्ष झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत . मात्र एवढी वर्षे मुंबईत ज्यांची सत्ता होती त्यांनी नक्की काय केले? मुंबई तोडणार तोडणार एवढेच तुणतुणे कायम वाजवले.
मिठी असो किंवा कोविड कुठेही डाका टाकायचे सोडले नाही. मुंबईच्या तिजोरीवर डाका घालून स्वतःची तिजोरी भरणारा खरा रेहमान डकैत कोण आहे? ते लोकांसमोर यायला हवे. अशा रेहमान डकैतना पाणी पाजणारी धुरंधर महायुतीच असेल.
हे देखील वाचा –
मेस्सी दौरा आयोजकाला १४ दिवसांची पोलीस कोठडी
काशीच्या अन्नपूर्णा मंदिरात आता १ वर्षांच्या बाळांना ‘दूध प्रसाद’









