Home / News / Shiv Sena is Saffron, But How Will the Shade Change? नवरात्रीचे राजकीय’ रंग !  शिवसेना: रंग भगवाच, पण कशा बदलणार छटा?

Shiv Sena is Saffron, But How Will the Shade Change? नवरात्रीचे राजकीय’ रंग !  शिवसेना: रंग भगवाच, पण कशा बदलणार छटा?

Navaratri’s 9 Political Coulur’s – Shiv Sena: The Color is Saffron, But How Will the Shade Change? तुळशीदास भोईटे –...

By: Team Navakal
Shiv Sena is Saffron, But How Will the Shade Change?

Navaratri’s 9 Political Coulur’s  – Shiv Sena: The Color is Saffron, But How Will the Shade Change?


तुळशीदास भोईटे Shiv Sena is Saffron, But How Will the Shade Change? शिवसेनेची (Shivsena) स्थापना 19 जून 1966 रोजी एका छोट्या खोलीत झाली. पण या पक्षाचा इतिहास साप्ताहिक मार्मिकपासून (Marmik)सुरू होतो. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey)यांनी 13 ऑगस्ट 1960 रोजी मार्मिक सुरू केले. याच मार्मिकमधून मराठी माणसांना खडबडून जागे करण्यासाठी ‌’वाचा आणि थंड बसा‌’ या मथळ्याखाली लेख येऊ लागले. मुंबईतील बड्या कंपन्या, खासगी आस्थापना यात मराठी कर्मचारी किती आणि अमराठी कर्मचारी किती याची यादी प्रसिद्ध होऊ लागली.

अमराठी नागरिकांचा भरणा दर्शविणारी टेलिफोन डिरेक्टरीची पाने प्रकाशित केली जात होती. आपल्या हक्काच्या नोकऱ्या, घरे ही परप्रांतीयांकडे जात आहेत हे यातून प्रखरपणे समोर आले आणि ते वाचून हळूहळू मराठी माणूस जागा होऊ लागला. पेटू लागला. त्यातूनच पुढे शिवसेना पक्षाची स्थापना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली.

त्यावेळी मुंबईतील बँकळा, मोठ्या कंपन्यांमध्ये त्याकाळी दाक्षिणात्य लॉबीचा वरचष्मा होता. त्यांच्या वर्चस्वाला दणका देण्यासाठी शिवसेनेने थेट घोषणा दिली, ‌’हटाव लुंगी, बजाव पुंगी!‌’ या घोषणेने खळबळ माजली. पण हेतू साध्य झाला. मराठी माणूस शिवसेनेच्या झेंड्याखाली एकवटला. मराठी माणसांसाठी सर्वत्र आंदोलने सुरू झाली. शिवसेनेचा झपाट्याने प्रसार झाला.


त्या काळात मुंबईत कम्युनिस्ट कामगार नेत्यांचा प्रचंड प्रभाव होता. कडवट भूमिकांमुळे त्यांना प्रतिसादही मोठा होता. संपाची हाक दिली की, कामगार तत्काळ प्रतिसाद देत. पण त्यामुळे उद्योगक्षेत्र त्रस्त झाले होते. तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी डाव्यांचा प्रभाव घटवण्यासाठी शिवसेनेला बळ दिले. त्यामुळे शिवसेनेला कुत्सितपणे ‌’वसंतसेना‌’ असे म्हटले जाई. आक्रमक डाव्यांविरोधात शिवसैनिक प्रतिकाराला पुढे सरसावू लागले. डाव्यांचा प्रभाव संपवण्याची काँग्रेसची चाल यशस्वी ठरली.

त्यातून डावे मागे हटू लागले. त्यात कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई खून प्रकरणाने शिवसेना वादाच्या भोवऱ्यात सापडली. तरीही हत्येनंतरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडीक विजयी झाले. ते शिवसेनेचे पहिले आमदार ठरले. डाव्यांच्या गिरणगावात आवाज कुणाचा, तर शिवसेनेचा घुमू लागला. (आज उद्धव ठाकरेंनी याच कम्युनिस्ट पक्षाशी युती केली आहे.) पुढे मुंबई बंद करण्याची ताकद ठाकरेंच्या एका आवाजात असल्याचे दिसू लागले. त्यातून त्यांचे नेतृत्व मुंबईत प्रस्थापित झाले.


स्थापनेनंतरच्या काही वर्षांनी शिवसेनेसोबत प्रजा समाजवादी पक्षाने युती केली. एकत्र निवडणूक लढवली. शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. शिवसेना शाखांना घरगुती तंटे ते विभागातील वाद, नोकऱ्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या लोकन्यायालयाचे स्वरूप आले. मराठी माणसाला नोकऱ्या मिळवून देण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना करण्यात आली.

मराठी माणसाने उद्योग-धंदा करावा यासाठी वडापावच्या गाड्यांपासून त्याची सुरुवात करण्यात आली. त्यातून मराठी माणसे शिवसेनेशी आपुलकीने जोडली गेली. 1969मध्ये शिवसेनेने आक्रमक आंदोलन केले. सीमाप्रश्नी झालेल्या हिंसक आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली. मुंबई पेटली. बाळासाहेबांनी आवाहन केल्यानंतर मुंबई शांत झाली.


कडवट मराठी अस्मितेचा पुरस्कार आणि त्याचवेळी हिंदुत्वाचा ज्वलंत अभिमान अशी शिवसेनेची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला ठाणे नगरपालिका, मुंबई मनपामध्ये शिवसेनेने राजकीय यश मिळवले. दरम्यानच्या काळात 1972-73 मध्ये शिवसेनेने मनपात मुस्लीम लीगशी युती केली होती. मुस्लीम लीगच्या पाठिंब्यावरच शिवसेनेचे सुधीर जोशी महापौर बनले होते. त्यावेळी बाळासाहेब आणि मुस्लीम लीगचे बनातवाला एकाच व्यासपीठावर आले होते. अर्थात, ही युती अल्पायुषी ठरली होती. तिच्याबद्दल कधी विचारले की, बाळासाहेब म्हणजे, युती म्हणजे गाजराची पुंगी. वाजली तर वाजली. नाहीतर खाल्ली.


शिवसेनेची मुंबई मनपात घोडदौड सुरूच होती. राज्याच्या राजकारणात गाजलेल्या मनोहर जोशींपासून अनेक मोठे नेते सुरुवातीला शिवसेनेचे नगरसेवक होते. महापौरही झाले. हा प्रवास सुरू असताना आणीबाणीच्या वेळी शिवसेना संकटात सापडली. बंदीचे वादळ घोंघावले. शिवसेनेने त्यावेळी इंदिरा गांधींना साथ दिली. पुढे आणीबाणी संपली. पण इंदिरा गांधींना पाठिंबा दिल्याने शिवसेनेचा वाईट काळ सुरू झाला.

आणीबाणीला प्रखर विरोध करणाऱ्या जनता पार्टीच्या सभेतून परतणाऱ्या जमावाने दादरला शिवसेना भवनावर दगडफेक केली. जनता लाट लक्षात घेत काही नेत्यांनी बाळासाहेबांना शिवसेनेला जनता पार्टीत विलीन करण्याचा सल्लाही दिला, पण त्यांनी नकार दिला. जनता पार्टीचे सरकार केंद्रात आले. परंतु अंतर्गत वादातून हे सरकार पडले. महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस सत्तेत आली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेसशी मैत्री होतीच.

तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले आणि बाळासाहेबांची घट्ट मैत्री होती. याच काळात शिवसेनेचे दोन नेते विधान परिषद आमदार झाले. तरीही 1985 पर्यंत शिवसेना निस्तेज होऊ लागल्याचे मानले जाऊ लागले होते. पण 1985च्या मनपा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुंबई महाराष्ट्रात दिसत नसल्याची खंत व्यक्त केली. शिवसेना त्याच मुद्याला पेटवत, मराठी माणसा, तुझी राजधानी मुंबई धोक्यात…असा प्रचार करत सत्तेवर आली.


त्यानंतर पुढे 1985 पासून 1992पर्यंत मुंबईत शिवसेनेचे महापौर बनले. 1992 मध्ये काँग्रेस मनपात सत्तेत आली. मात्र बाबरी मशीद पाडून भाजपाने प्रखर हिंदुत्ववादाची घोषणा केली, तेव्हा शिवसेनेने काँग्रेसची साथ सोडत भाजपाला जवळ केले. 1989 मध्ये शिवसेना-भाजपा यांची युती झाली. याचे प्रमुख श्रेय भाजपा नेते प्रमोद महाजन यांना आहे.

1995 मध्ये राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. त्याच्या प्रभावाने मुंबई पालिकेतून काँग्रेसची सत्ता गेली. तेव्हापासून आजवर काँग्रेसला पालिकेत यश मिळवता आलेले नाही. मुंबईत शिवसेनेचा महापौर झाला. 2022पर्यंत हेच चित्र होते. शिवसेना आणि भाजपात कुरबुर सुरू झाली होती, पण तरीही दोन्ही पक्ष एकत्र होते.


शिवसेनेचा राजकीय प्रभाव काहीही असो, पण शिवसेना सोडणार, त्यांना फोडणार, असेच शिवसेनेचे धोरण राहिले. कृष्णा देसाई, ठाण्यातील नगरसेवक सदानंद खोपकर यांच्या हत्यांमुळे शिवसेनेची तशी दहशत होती. मात्र छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना मारण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि तिथेच शिवसेनेची दहशत संपली.

पुढे गणेश नाईक फुटले, नारायण राणे फुटले, एवढेच नाही तर ठाकरेंचे घरही फुटले. राज ठाकरे वेगळे झाले. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. हा सर्वात मोठा धक्का होता. मनसेच्या स्थापनेनंतरची 2007ची मनपा निवडणूक उद्धव ठाकरे यांना आव्हानात्मक होती. पण उद्धव ठाकरेंनी करून दाखवले. मी मुंबईकर अभियानाला मुंबईकरांनी साथ दिली, शिवसेना सत्तेत राहिली. पण 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना फटका बसला.

मनसेचे 13 आमदार निवडून आले. 2012मध्ये उद्धव ठाकरेंनी मुंबई मनपा पुन्हा राखली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले. उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे पूर्णपणे आली. बाळासाहेब गेल्यानंतर 2014 साली लोकसभेची निवडणूक झाली, तेव्हा भाजपा सोबत होती. लोकसभा निकालानंतर मोदी सत्तेत आले आणि भाजपाने रणनीती बदलली.


2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी ऐनवेळी शिवसेनेशी युती तोडल्याचे जाहीर केले. शिवसेनेची सर्व 288 मतदारसंघांसाठी तयारी नव्हती. पण शिवसेनेने कडवट लढत दिली. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षांनी ही निवडणूक स्वबळावर लढवली. भाजपाने यात सर्वाधिक जागा मिळवल्या. शिवसेनेच्या स्वबळावर दुसऱ्या क्रमांकाच्या 63 जागा आल्या. पण बहुमत नव्हते.

भाजपाला शिवसेनेची गरज होती, पण शरद पवारांनी ऐनवेळी न मागताच भाजपाला बाहेरून पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेची तडजोडीची ताकद संपली. 2017ची मनपा निवडणूक आली. शिवसेना-भाजपा परस्परांविरोधात लढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ‌‘वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजेन दात…‌’हा डायलॉग त्याच निवडणुकीतील.

शिवसैनिकांशी सरकार भेदभाव करत दडपशाही करत असल्याचा आरोप करत सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या विरोधात मंचावर येऊन उद्धव ठाकरेंकडे राजीनामा देण्याचा नाट्यमय प्रसंगही याच निवडणुकीत घडला.2019ची निवडणूक शिवसेना-भाजपा एकत्र लढले. लोकसभेनंतर विधानसभेचा निकाल लागला. भाजपाच्या जागा 2014च्या तुलनेत कमी झाल्या. शिवसेनेने ऐनवेळी सर्व पर्याय खुले असल्याचे जाहीर केले. शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मागितले.

अमित शहा यांनी तसे आश्वासन दिले असल्याचे सांगितले. पण भाजपाने ही गोष्ट कधीच मान्य केली नाही. या मुद्यावर ठाकरेंनी अमित शहांवर फसवणुकीचा आरोप केला. दोन्ही पक्ष एकत्र येत नव्हते. या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून पक्षात फूट पाडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत भल्या सकाळी शपथ घेतली, हे महाराष्ट्राने पाहिले. पण शरद पवार मैदानात उतरले आणि अवघ्या काही तासांत हे अजित पवारांचे बंड संपले.

उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेसशी हातमिळवणी करत मविआची स्थापना केली. ते मविआचे मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील कुणी थेट सत्तेत आला. उद्धव ठाकरे यांची प्रतिमा कुटुंबप्रमुखासारखी उंचावली. पण कोरोनामुळे उद्धव ठाकरेंना राज्यकारभार हाकताना खूप अडचणी आल्या. कोरोना संपला आणि शिवसेनेसमोर आणखी नवे संकट आले.


शिवसेनेच्या वाटचालीत सर्वात गंभीर असा पुढचा टप्पा आला. एकनाथ शिंदे यांच्या फुटण्याचा. शिंदे केवळ शिवसेनेतून फुटले नाहीत तर त्यांनी अवघा पक्षच त्यांच्या बरोबर नेला. त्यांची मुंबई ते गुवाहाटी व्हाया सुरत अशी राजकीय यात्रा गाजली. पुढे ते गोवामार्गे मुंबईत परतले. शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपाने महायुती सरकार स्थापन केले. अडीच वर्षे शिंदे मुख्यमंत्री होते. फडणवीस उपमुख्यमंत्री होते. लोकसभेला ठाकरेंची शिवसेना आणि त्यांच्यामागोमाग शिंदेंची शिवसेनाही यशस्वी ठरली.

पण विधानसभेआधी लाडकी बहीण, हिंदू-मुसलमान ध्रुवीकरण सारे काही घडले. विधानसभेला एकनाथ शिंदेंनी चांगल्या जागा मिळवल्या. पण ठाकरे मात्र 20वरच पोहोचू शकले. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना सोपवले. ठाकरेंनी त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जनतेच्या न्यायालयानंतर आता कायद्याच्या न्यायालयातील लढाई होणार आहे .

तिथे कुणाला कौल मिळणार? न्यायालय कुणाचा पक्ष खरा ठरवणार? पक्ष अस्सल ठरला, चिन्ह मिळाले तरीही शिवसेना या नावाला साजेशी कामगिरी कोण बजावू शकेल? लोकांचा प्रतिसाद कसा असेल? कायद्याच्या न्यायालयानंतर पुढे लोकांच्या न्यायालयातच याचा निकाल लागेल!


हे देखील वाचा –

जुहूचा भूखंड दोन महिन्यांत मित्राला बहाल ! खा. वर्षा गायकवाडांचा आरोप ! 800 कोटींचा घोटाळा

७० हजार कर्मचारी मुंबई निवडणुकीच्या तयारीला

वैमानिकांना दोषी धरणे दुर्दैवी; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या