SIT Team Formed in Bogus Teacher Recruitment Case
मुंबई – बनावट शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षक भरती प्रकरणात(Bogus teacher recruitment scam) चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी)(Fake candidate ID teacher recruitment) स्थापन केले आहे. हे पथक नागपूरसोबतच नाशिक, जळगाव, मुंबई, बीड आणि लातूर येथील शिक्षक भरती प्रकरणांची चौकशी करणार आहे.(Teacher recruitment scam Nagpur)
नागपूर विभागात काही दिवसांपूर्वी बोगस शिक्षक (Fake teacher recruitment case)भरतीचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. अपात्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करून त्यांना वेतन अदा करण्यात आले. या प्रकरणी बनावट शालार्थ आयडी तयार करून भरती केल्याच्या आरोपावरून शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली होती.(Teacher recruitment corruption)
पुणे येथील विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नियुक्त करण्यात आली आहे. या पथकात पोलिस महानिरीक्षक मनोज शर्मा आणि शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक हरुन आतार यांचा समावेश आहे. या पथकाला तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.