Six Villages Including Rawangaon Submerged in Nanded! 5 People Missing
नांदेड – मुखेड तालुक्यात काल मध्यरात्री ढगफुटीसदृश (Maharashtra heavy rain)पावसामुळे (Rawangaon Flood)रावणगाव, भासवाडी, हसनाळ, भेंडेगाव, भिंगोली आणि सांगवी भादेव या सहा गावांमध्ये पुराचे घुसले.नांदेड जिल्ह्यात २०६ मिमी पाऊस पडला. भिंगोली येथील (5 people missing )५ नागरिक बेपत्ता झाले आहेत. एसडीआरएफ, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती (CM Fadanvis)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुखेड (mukhed)तालुक्यात रात्री दीड वाजताच्या सुमारास लोक साखरझोपेत असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. उदगीर धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने लेंडी नदीला पूर आला. अलीकडेच पूर्ण झालेल्या लेंडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामुळे पूरपरिस्थिती आणखी गंभीर झाली. पुराच्या पाण्यात अनेक जनावरे दगावली. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरे पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. रावणगाव येथे तब्बल २२५ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. हसनाळमधून ८, भासवाडीमधून २० आणि भिंगोलीमधून ४० नागरिकांना बचावपथकाने सुखरूप बाहेर काढले. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे पुराच्या पाण्यात बुडून ५० म्हशी मृत्युमुखी पडल्या आहेत. प्रशासनाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात २०० हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे.
मुखेडचे (MLA)आमदार तुषार राठोड यांनी माहिती दिली की, काल रात्रीपासून पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने एका रात्रीत पाण्याची पातळी तब्बल १८ फुटांनी वाढली. सध्या पावसाचा जोर ओसरलेला असला तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहावे.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन (Minister Girish Mahajan)मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नांदेडच्या मुखेड येथील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेणार आहोत. गावांत चारी बाजूंनी पाणी घुसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. आपत्तीग्रस्त नागरिकांच्या अन्न, पाणी व निवाऱ्याची व्यवस्था शाळा व शासकीय इमारतींमध्ये केली जाणार आहे. नागरिकांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासन अलर्ट मोडवर आहे.