Home / News / सोनू सूदच्या पत्नीचा भीषण अपघात, हॉस्पिटलने प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची माहिती

सोनू सूदच्या पत्नीचा भीषण अपघात, हॉस्पिटलने प्रकृतीबाबत दिली महत्त्वाची माहिती

Sonu Sood’s Wife Accident | बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) पत्नी सोनाली सूदचा (Sonali Sood) अपघात झाला आहे. सोनाली...

By: Team Navakal
Sonu Sood

Sonu Sood’s Wife Accident | बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) पत्नी सोनाली सूदचा (Sonali Sood) अपघात झाला आहे. सोनाली या त्यांची बहीण आणि भाच्यासोबत मुंबई-नागपूर महामार्गावर प्रवास करत असताना त्यांच्या कारची धडक एका ट्रकला बसली. या भीषण अपघातात तिघांनाही दुखापती झाली आहे.

24 मार्चला त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या सोनाली या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या अपघातात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले असून, याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्या रुग्णालयात सोनाली सूद यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.   सध्या त्या नागपूरच्या मॅक्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयाने मेडिकल बुलेटिनद्वारे माहिती दिली की, सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली, त्यांच्या बहीण आणि भाच्याला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजी करण्यासारखे काहीही नाही. 

हॉस्पिटलने माहिती दिली की, सोनाली सूद यांना इमर्जन्सी डिपार्टमेंटमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्यांच्या भाच्याला प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली सूद आणि त्यांची बहीण सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दोघींची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, याआधी सोनू सूदने देखील पत्नीच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. त्या आता ठीक आहेत. त्या चमत्कारिकरित्या वाचल्या. ओम साई राम.’, अशी प्रतिक्रिया सोनू सूदने दिली होती. 

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या