Thackeray Brands Voter List Chaos as Treason – राज्यनिवडणूक आयोगाच्या मतदारयादी गोंधळावर उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांनी देशद्रोहाचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स पोस्ट करून प्रारूप यादी १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली. ती काही लोकांना आधीच दिली तर सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने २० नोव्हेंबर रोजी का उपलब्ध झाली, असा सवाल केला.
आ. आदित्य ठाकरेंनी एक्सवर लिहिले की, हा गोंधळ नव्हे तर देशद्रोहाचा गुन्हाच आहे. काल आमच्या एका पदाधिकाऱ्याने प्रारूप मतदार यादी महापालिकेतील मध्यवर्ती निवडणूक यंत्रणेकडून रीतसर शुल्क भरून घेतली, ही यादी सर्वांनाच मिळते. पण या यादीवर १४ नोव्हेंबरची तारीख आहे. सुरुवातीला यादी ती ७ नोव्हेंबरला येणार होती.
मग १४ आणि शेवटी यादी सर्वांसाठी २० नोव्हेंबर रोजी ऑनलाईन प्रकाशित झाली. तर मग १४ तारखेला जी प्रारूप मतदार यादी तयार होती ती कोणाला दिली? काही ठराविक लोकांनाच दिली का? बाकीच्यांना ही यादी देण्यासाठी दिरंगाई का? यादीमध्ये काही गडबड करायची होती म्हणून तुम्ही थांबलात का? कोणाच्या आदेशाची वाट पाहत होतात? तुमचा देशद्रोह पकडला जाईल म्हणून ही यादी मशीन रिडेबल नाही का ?
हे देखील वाचा –
No Rift with Shinde : शिंदेंसोबत दुरावा नाही!फडणवीसांचा खुलासा
रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय! वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ नवीन स्थानकावर थांबणार









