Thackeray Brothers Appear Together, ‘Marathi’ Celebration in Belgaon
बेळगाव – काल मुंबईतील वरळी डोम येथे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (Thackeray Brothers Event)या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची विजयी सभा पार पडली. या सभेच्या निमित्ताने तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकाच मंचावर एकत्र (Maharashtra Politics 2025)आल्याचे दिसताच बेळगावात मराठी भाषिकांनी मोठा जल्लोष केला.(Marathi Unity in Belgaon)
या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात मराठी भाषिकांनी एकत्र येऊन जल्लोष केला. नगरसेवक रवी सांळुखे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी फटाके वाजवले,मिठाईचे वाटप केले. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मराठी माणसाची ताकद वाढली आहे. महाराष्ट्रातील जनता ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत होती. पण उशिरा का होईना मराठीसाठी दोन्ही बंधू एकत्र आल्याने जनता खूष आहे, असे नगरसेवक रवी सांळुके यांनी सांगितले. यावेळी बेळगाव उबाठा व मनसेचे कार्यकर्ते तसेच मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते