Thackeray Brothers’ Video – मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी आपली युती झाल्याची घोषणा नुकतीच एका पत्रकार परिषदेत केली.त्यावेळी मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आपल्याकडे फडणवीस यांचे बरेच व्हिडिओ असल्याचे जाहीर केले होते.
त्यांचा या वक्त्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचारासाठी आक्रमक रणनीती आखली आहे. मुंबईतील निवडणूक प्रचारसभांमध्ये राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे एकमेकांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे जुने व्हिडीओ भाजपा प्रचारसभेत दाखवणार आहे .
ठाकरे बंधूंचे परस्परविरोधी व्हिडिओ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत आपापले पक्ष सांभाळताना अनेकदा एकमेकांवर टीका केली आहे.
आता याच राजकीय भूमिकांतील मतभेद अधोरेखित करणाऱ्या भाषणांचे व्हिडीओ भाजपा आपल्या प्रचार सभांमध्ये दाखविणार आहे.प्रामुख्याने शिवसेना फुटल्यानंतर तसेच विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेल्या परस्परविरोधी वक्तव्यांचा प्रचारात वापर करण्याची तयारी भाजपने केली असल्याचे समजते.
हे देखील वाचा –









