Railway ticket : भारतीय रेल्वे पुढील वर्षांत जानेवारीपासून प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकीटाची (Railway ticket) ऑनलाइन प्रवास तारीख बदलण्याची सुविधा मोफत देणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिली. यामध्ये कोणतेही रद्द शुल्क आकारले जाणार नाही.मात्र सीट मिळण्याची हमी नसणार आणि किंमत जास्त असल्यास फरक भरावा लागेल.
केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, आता कन्फर्म रेल्वे तिकिटाची तारीख बदलल्यास कोणतेही पैसे कापले जाणार नाहीत. याचा अर्थ असा की, जर तुमच्याकडे २० नोव्हेंबर रोजी मुंबईहून पुण्याला जाण्याचे कन्फर्म तिकीट असेल आणि काही कारणास्तव तुमचा बेत ५ दिवसांनी पुढे ढकलला, तर तुम्हाला २५ नोव्हेंबर साठी नवीन तिकीट काढण्याची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या २९ नोव्हेंबरच्या कन्फर्म रेल्वे तिकिटाची तारीख ऑनलाइन बदलू शकाल आणि त्याच तिकिटावर २५ नोव्हेंबर रोजी पुण्याला प्रवास करू शकाल.सध्याच्या व्यवस्थेनुसार, प्रवासाचा बेत बदलल्यास तुम्हाला तुमचे तिकीट रद्द करावे लागते. त्यानंतर पुढील तारखेसाठी नव्याने तिकीट बुक करावे लागते.यामध्ये तिकीट रद्द करण्याचे पैसे कापले जातात.तसेच, पुढील तारखेला कन्फर्म तिकीट मिळेलच याचीही खात्री नसते. नवीन नियमानुसार कन्फर्म तिकिटाची तारीख बदलली तरी जागेची हमी मात्र मिळणार नाही.तसेच जर तिकिटाची किंमत वाढली असेल तर ती जागा रक्कम भरावी लागेल.
हे देखील वाचा –
अजित पवारांनी साप पोसलेत ! मनोज जरांगेंची विखारी टीका
स्वसंरक्षणासाठीच अक्षय शिंदेचा एनकाऊंटर पोलिसांना न्यायिक समितीने क्लीन चीट दिली