Home / arthmitra / Torres Scam: टोरेस घोटाळा नक्की कसा झाला? जाणून घ्या

Torres Scam: टोरेस घोटाळा नक्की कसा झाला? जाणून घ्या

Torres Scam in Mumbai: आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली लाखो लोकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. टोरेस नावाच्या कंपनीने लाखो लोकांना कोट्यावधी...

By: E-Paper Navakal

Torres Scam in Mumbai: आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली लाखो लोकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. टोरेस नावाच्या कंपनीने लाखो लोकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातला आहे. मुंबई व आजुबाजूच्या परिसरात टोरेस ज्वेलरी नावाची 5 ते 6 दुकाने उघडण्यात आली होती. या कंपनीने नागरिकांना जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र, परतावा येणे अचानक बंद झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले.

लाखो नागरिकांची फसवणूक कशी झाली?

प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडद्वारे टोरेस नाव असलेली ज्वेलरीची दुकाने मुंबईत उघडण्यात आली. टोरेस कंपनीद्वारे (Torres Scam) नागरिकांना भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवले. नागरिकांनी केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना परदेशी खडे, हिरे, दागिने मोफत देण्याचे, तसेच, गुंतवणुकीच्या रक्कमेवर 6 ते 11 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाईल असे सांगितले.

नागरिक कंपनीच्या योजनेमध्ये 4 हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकत होते. 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर नागरिकांना 10 हजार रुपयांचा मोईसॅनाईट स्टोनचे पेडंटही मोफत दिले जात होते. गुंतवणुकीवर पुढील 52 आठवड्यात 11 टक्क्यांपर्यंत व्याज देण्याचे आश्वासनही दिले होते.

नागरिकांना योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात परतावा देखील देण्यात आला. त्यानंतर गुंतवणुकीवर परतावा मिळत आहे असे वाटल्याने नागरिकांनी अधिकाधिक गुंतवणूक केली. मात्र, डिसेंबरपासून अचानक परतावा मिळणे बंद झाले. यानंतर नागरिकांनी टोरेस कंपनीच्या ऑफिसमध्ये येऊन विचारणा करण्यास सुरुवात केली. मात्र, कंपनीचे वरिष्ठ कर्मचारीच फरार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आला. नागरिकांना देण्यात आलेले परदेशी खडे, हिरे हे देखील बनावट असल्याचे समोर आले.

या घोटाळ्यामध्ये (Torres Fraud) आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तर काही आरोपी फरार आहेत. टोरेस घोटाळ्यामध्ये जवळपास सव्वा लाख नागरिकांची 200 कोटी रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. फसवणुकीचा हा आकडा यापेक्षाही मोठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या