Home / News / Toyota Innova Crysta खरेदी करण्याचा विचार आहे? जाणून किंमत आणि फीचर्सविषयी सर्वकाही

Toyota Innova Crysta खरेदी करण्याचा विचार आहे? जाणून किंमत आणि फीचर्सविषयी सर्वकाही

Toyota Innova Crysta : भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय एमपीव्हीमध्ये टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचा समावेश होतो. शानदार फीचर्स, सुरक्षा व जास्त स्पेस यामुळे या...

By: E-Paper Navakal

Toyota Innova Crysta : भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय एमपीव्हीमध्ये टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचा समावेश होतो. शानदार फीचर्स, सुरक्षा व जास्त स्पेस यामुळे या गाडीला ग्राहकांची मोठी पसंती मिळते. तुम्ही देखील नवीन Toyota Innova Crysta खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी या एमपीव्हीची किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घ्यायला हवी.

Toyota Innova Crysta ची किंमत

Toyota Innova Crysta ची किंमत 19.99 लाख रुपयांपासून ते 26.55 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे. प्रत्येक शहरानुसार गाडीच्या किंमतीत बदल होऊ शकतो. ऑन रोड किंमत देखील वेगळी असू शकते.

तुम्ही गाडीला ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. तुम्ही गाडीचे बेस व्हेरिएंट 4 लाख रुपये डाउन पेमेंट करून घरी घेऊन जाऊ शकता. उर्वरित रक्कमेसाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागले. सर्वसाधारणपणे कार लोनवरील व्याज दर हे 9 टक्क्यांपर्यत असते. अशाप्रकारे, तुम्ही दरमहिन्याला जवळपास 45 ते 50 हजार रुपये ईएमआय भरू शकता. तुमचा ईएमआय किती आहे, त्यावर कर्जाचा कालावधी ठरतो.

Toyota Innova Crysta चे फीचर्स

टोयोटा इनोव्हा क्रिस्टामध्ये एकापेक्षा एक शानदार फीचर्स देण्यात आले आहे. कारमध्ये देण्यात आलेल्या एलईडी हेडलँम्पमुळे गाडीला शानदार लूक प्राप्त होतो. यामध्ये 20.32 सेंटीमीटर डिस्प्ले दिला असून, यात अँड्राइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीची सुविधा मिळते. याद्वारे तुम्ही स्मार्टफोनला कारशी कनेक्ट करू शकता.  

सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, व्हिकल स्टेबिलिटी कंट्रोल, हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल सारखे फीचर्स मिळतात. कारच्या G, GX व्हेरिएंटमध्ये 3 एअरबॅग्स देण्यात आले आहेत. तर VX, ZX व्हेरिएंटमध्ये 7 एअरबॅघ्स मिळतील.

टोयोटाची च्या या एमपीव्हीमध्ये 2.4 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले असून, हे 150 बीएचपी पॉवर आणि 343 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सचा पर्याय मिळतो.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या