Home / News / गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी फिल्मसिटीतील झाडे तोडणार!सुप्रिम कोर्टाची मंजुरी

गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी फिल्मसिटीतील झाडे तोडणार!सुप्रिम कोर्टाची मंजुरी

Trees in Film City to Be Cut for Goregaon-Mulund Link Road! Supreme Court Grants Approval

Trees in Film City to Be Cut for Goregaon-Mulund Link Road! Supreme Court Grants Approval

मुंबई – मुंबईची पूर्व आणि पश्चिम उपनगरे जोडणारा गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याच्या (जीएमएलआर) (Goregaon Mulund Link Road)निर्मितीसाठी गोरेगावच्या चित्रनगरीतील (फिल्मसिटी) ९५ झाडे तोडण्यास(Film City tree cutting) सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी (Supreme Court approval)दिली. मात्र तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात तेवढीच झाडे लावण्याच्या अटीवर न्यायालयाने ही परवानगी दिली आहे.(Mumbai development project)

जीएमएलआरच्या मार्गात अडथळा ठरणारी ही झाडे तोडण्याची परवानगी मुंबई महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली होती. या प्रकरणी मागील सुनावणीदरम्यान २९ जुलै रोजी न्यायालयाने पर्यावरण आणि विकास याचा समतोल साधण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करून पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला यासंबंधी निर्णय घेण्याची अनुमती दिली होती. त्यानुसार वृक्ष प्राधिकरणाने पर्यायी (Environmental impact Mumbai)वृक्षारोपण करण्याच्या अटीवर पालिकेला परवानगी दिली. अंतिम मंजुरीसाठी याचिकेवर सरन्यायाधिश भूषण गवई आणि न्या. के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर आली असता न्यायालयाने अंतिम मंजुरी दिली.(Urban planning Mumbai)

दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने मुंबईच्या वन संरक्षकांना पर्यायी वृक्षारोपणाबद्दल सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.