Trump U-turn: Xi Praised – काल परवापर्यंत चीनी राज्यकर्त्यांवर कडाडून टीका करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले आहे.ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोशल या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची चक्क प्रशंसा केली आहे.
दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर चीनने घातलेल्या निर्बंधांमुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी गेल्या शुक्रवारी चीनी आयातीवर अतिरिक्त शंभर टक्के आयात शुल्क लागू करण्याची धमकी दिली होती.
या अतिरिक्त शंभर टक्के आयात शुल्कामुळे चीनी मालावर अमेरिका १ नोव्हेंबरपासून एकूण १३० टक्के शुल्क लावणार आहे.ट्रम्प यांच्या या निर्णयाला चीनने दुसऱ्याच दिवशी जशास तसे प्रत्युत्तर दिले.
आम्हाला अमेरिकेशी व्यापार युध्द छेडायचे नाही.मात्र आमच्यावर युध्द लादल्यास पूर्ण ताकदीनिशी लढण्यास आम्ही तयार आहोत,अशी कणखर भूमिका चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी शनिवारी घेतली.या घडामोडींमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढला होता.
या पार्श्वभूमूवर ट्रम्प यांनी आज कोलांटउडी घेत जिनपिंग अत्यंत आदरणीय नेते आहेत,अशा शब्दात प्रशंसा केली. अमेरिका चीनसोबत सलोख्याचे संबंध ठेवू इच्छिते.आम्हाला आपसांत संघर्ष नको आहे,अशी नरमाईची भूमिका ट्रम्प यांनी घेतली.
हे देखील वाचा –
‘जे हुंडा घेतात ते नामर्द…’; अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे परखड विधान, म्हणाले…