Home / महाराष्ट्र / उबर चालकाची गाडी गॅरेजमध्ये ! मृतदेह टोलनाक्यावर सापडला

उबर चालकाची गाडी गॅरेजमध्ये ! मृतदेह टोलनाक्यावर सापडला

मुंबई – मुंबईतील मानखूर्द (Mankhurd)पोलिसांनी बेपत्ता झालेल्या उबर कॅब चालकाचा (missing Uber driver)शोध लावला आहे. या उबर चालकाची हत्या झाल्याचे...

By: Team Navakal
Uber Driver

मुंबई – मुंबईतील मानखूर्द (Mankhurd)पोलिसांनी बेपत्ता झालेल्या उबर कॅब चालकाचा (missing Uber driver)शोध लावला आहे. या उबर चालकाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला (accused)अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उबर चालकाची हत्या करणारा त्याचाच मित्र आहे. कारच्या व्यवहारातून हा हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मोहम्मद सलिम अब्दुल करीम वाहीद अन्सारी (Mohammad Salim Abdul Karim Wahid Ansari) असे मृत उबेर चालकाचे नाव आहे. तो १९ जून रोजी पुण्याला प्रवासी (passenger)घेऊन गेल्यापासून बेपत्ता होता. कुटुंबीयांचा त्याच्याशी संपर्क न झाल्याने त्याच्या भावाने मानखुर्द पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती.

अन्सारीच्या शोधासाठी तीन विशेष पथके तयार करण्यात आली होती. या तपासात त्याची चारचाकी पुण्यातील भोसरी येथे आढळली. त्यानंतर त्या परिसरात गाडी उभी करणाऱ्याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. त्यावेळी उर्स टोलनाक्याजवळ एकाची हत्या (murdered)झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे पोहचून तो मृतदेह पाहिला असता तो अन्सारीचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अन्सारीच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी केली. पोलिसांनी अन्सारीच्या मोबाइलवर आलेले आणि त्याने केलेले फोन कॉल तपासले. तसेच पोलिसांनी मुंबई-पुणे ध्रुतगतीमार्गावरील टोल नाका आणि खासगी ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याचा मित्र आदित्य याला लातूर येथून अटक केली. चौकशीदरम्यान आदित्यने सांगितले की, काही दिवसांपूर्वी आदित्यने अन्सारीशी त्याची गाडी खरेदी करण्याबाबत बोलणी केली होती. १८ जून रोजी ते दोघे दादरमध्ये भेटले आणि तेथून पुण्याला निघाले. वाटेतच त्यांच्यात पैशांवरून वाद झाले. आदित्यने संतापाच्या भरात डॅशबोर्डमध्ये ठेवलेल्या चाकूने अन्सारीची हत्या केली आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देत तिथून पळ काढला. गाडी खराब झाल्यावर आदित्यने टोइंग व्हॅनच्या मदतीने ती भोसरीतील एका गॅरेजमध्ये सोडली.

Web Title:
संबंधित बातम्या