UBT to Deny Tickets to Seniors – मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उबाठाने भाकरी फिरवण्याची रणनिती आखली आहे. यामुळे साठी पार केलेल्या माजी नगरसेवकांना पुन्हा पालिका निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नाही.
ज्येष्ठांना पक्ष कामाला लावून तरुणांचे नेतृत्व तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. आगामी निवडणुकीत उबाठा ७० टक्के जागांवर तरुण वर्गाला संधी देणार आहे . त्यामुळे इच्छुक ज्येष्ठांना मोठा धक्का बसणार आहे.
मात्र यामुळे साठी पार केलेले माजी नगरसेवक नाराज होण्याचा धोका आहे. महापालिका निवडणूक आणि प्रभागातील समस्या या ज्येष्ठांना ठाऊक आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी पत्करणे हा उबाठासाठी आत्मघातकी निर्णय ठरू शकतो.
यावर उमेदवारी नाकारलेल्या ज्येष्ठांच्या पसंतीचा तरुण उमेदवार देण्याचा उबाठाचा विचार आहे. ३० टक्के अनुभवी शिवसैनिक, तर ७० टक्के नवीन तरुणांना संधी देत नवे-जुने असा समन्वय साधला जाणार आहे. २०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या.
पण शिवसेनेतल्या फाटाफुटीमध्ये यापैकी अर्ध्याहून अधिक नगरसेवक हे एकनाथ शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे उबाठाकडे सध्या माजी नगरसेवकांची संख्याही पुरेशी नाही. त्यातून मार्ग काढण्यासाठीच उबाठाकडून तरुण तुर्कांना संधी देणार असल्याचे समजते. दरम्यान, राज ठाकरे हे सोबत आल्याने पालिकेमध्ये उबाठाला किती जागा मिळतात हाही महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
हे देखील वाचा –
दोन-चार मंत्र्यांना कापा…’; रविकांत तुपकरांचे वादग्रस्त विधान









