Home / News / Uddhav Thackeray visit to Marathwada : उद्धव ठाकरे दिवाळीनंतर मराठवाडा दौऱ्यावर जाणार

Uddhav Thackeray visit to Marathwada : उद्धव ठाकरे दिवाळीनंतर मराठवाडा दौऱ्यावर जाणार

Uddhav Thackeray visit to Marathwada – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक सोहेल शेख, रवींद्र तांगडे...

By: Team Navakal
Uddhav Thackeray visit to Marathwada

Uddhav Thackeray visit to Marathwada – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक सोहेल शेख, रवींद्र तांगडे यांनी आज उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी पक्षप्रवेश केला.

यावेळी बोलताना ठाकरेंनी दिवाळीनंतर मराठवाडा दौरा करणार असल्याचे सांगितले. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी ८ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात येऊन गेलो. तेथून निघताना मी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती होईपर्यंत या सरकारला सोडणार नसल्याची ग्वाही दिली होती.

सध्या सरकारची निव्वळ फसवाफसवी सुरू आहे. खरडून गेलेल्या जमिनीला त्यांनी हेक्टरी तीन साडेतीन लाख जाहीर केले. सरकारने या साडेतीन लाखांपैकी १ लाख दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकावेत.

कर्जाचे पुनर्गठन नव्हे तर कर्जमाफी करा, ही आपली मागणी आहे. आत्ता सरकारच्या मदतीपैकी फार तटपुंजी जेमतेम मदत शेतकऱ्यांच्या हातात पडत आहे. नुकसान भरपाई नाही तर मोलमजुरी मिळाल्यासारखे त्यांना पैसे मिळत आहेत.

यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मी मुंबईत असलो तरी माझा अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आदी नेत्यांशी संपर्क सुरू असतो. तिकडे काय चालले आहे, याची मला संपूर्ण माहिती मिळते. मी तिकडे पुन्हा दिवाळीनंतर येणार आहे.


हे देखील वाचा –

रेल्वेची तिकीट बूकिंग वेबसाईट पुन्हा ठप्प

हरिओमच्या कुटुंबियांची राहुल गांधींनी भेट घेतली

यंदा शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी साजरी करणार ! शरद पवारांची माहिती

Web Title:
संबंधित बातम्या