Uddhav Thackeray’s Birthday, Raj Thackeray Visits Matoshree! Hug in Front of Balasaheb’s Portrait
मुंबई – शिवसेना उबाठा(UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि मनसे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)आज दीर्घकाळाने मातोश्रीवर(Matoshree)भेटले. उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त (65th birthday)शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे याठिकाणी आले होते. त्यामुळे ठाकरे बंधूंची भेट केवळ अभिष्टचिंतन आहे की नव्या युतीची नांदी, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. या ऐतिहासिक भेटीने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले.
राज ठाकरे यांनी यापूर्वी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर काही कारणास्तव मोजक्या वेळी मातोश्रीवर गेले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसताना आणि २०१९ मध्ये अमित ठाकरेंच्या(Amit Thackeray wedding invite ) लग्नाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने ते मातोश्रीवर गेले होते. आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास राज ठाकरे यांनी मातोश्रीवर पोहोचले. त्यांच्यासोबत बाळा नांदगावकरही होते. संजय राऊत यांनी मातोश्रीवर त्यांचे स्वागत केले. बाळासाहेबांचे खोलीत राज ठाकरे यांनी उद्धव यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. तर भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी खूप खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली. तर संजय राऊत यांनी दोन भाऊ मनाने एकत्र आल्याची प्रतिक्रिया दिली.
उद्धव- राज यांच्या भेटीनंतर आज सायंकाळी उबाठाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)आणि मनसे नेते अमित ठाकरे हे ज्युनिअर ठाकरे बंधूही (Junior Thackeraybrothers )वरळीच्या राजाचे(Worli Raja) एकत्रित पाद्यपूजन करणार आहेत.
अनेक वर्षानंतर महाराष्ट्रात मराठी भाषेच्या (Marathi)मुद्द्यावर ठाकरे बंधू एका व्यासपीठावर आल्यानंतर त्यानंतर दोघांची राजकीय युती होणार असल्याची चर्चा महाराष्ट्रात होत होती. तिला आज बळ मिळाले. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे.