Union Complains Against TCS – टाटाच्या टाटा (TATA) कन्सलटन्सी सर्व्हिसेस या कंपनीने(TCS) पुण्यातील त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अडीच हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. यामुळे मोठी खळबळ माजली आहे. टीसीएसने यापूर्वी जाहीर केले आहे की, यावर्षी ते जगभरातील त्यांच्या १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहेत.
टाटाच्या एकूण कर्मचा-यांपैकी ही दोन टक्के संख्या आहे. नवे नियोजन, नवी कौशल्य, कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे टीसीएसने सांगितले आहे. मात्र कामगार कपात करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे नाराजी पसरली असून टीसीएसच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी नक्रार केली आहे.
माहिती व तंत्रज्ञान कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी लढणाऱ्या नाईट्स या कामगार संघटनेने टीसीएसच्या कामगार कपातीच्या विरोधात केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे लेखी तक्रार केली. या विभागाने ही तक्रार महाराष्ट्रातील कामगार मंत्रालय व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवली आहे.
मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही नाईटस संघटनेचे अध्यक्ष हरप्रीन सलुजा म्हणाले की, टीसीएसच्या भारतातील कामगारांनी तक्रार केली आहे. पुण्यात ज्या २५०० कामगारांना काढले त्यांना नोटीस दिलेली नव्हती. हे औद्योगिक विवाद कायद्याचे उल्लंघन आहे.
गेली दहा ते वीस वर्षे हे कामगार काम करीत आहेत, त्यांची वयाची चाळीशी ओलांडली आहे. त्यांना लगेच दुसरी नोकरी मिळण्याची शक्यता नाही. अचानक नोकरीवरून काढल्याने ते आर्थिक अडचणीत आहेत. शाळेची फी, हप्त आदि खर्च कसा भागवणार याची त्यांना चिंता आहे.
हे देखील वाचा –
SBI Report : पुढील वर्षापर्यंत महागाई खुपच कमी राहाणार !स्टेट बँकेचा अहवाल
दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा महिलांना मोठा शब्द; ‘लाडकी बहीण योजने’बद्दल म्हणाले…