Cloudburst Hits Uttarkashi Again! Landslide in Himachal
Uttarkashi Flooded Again – उत्तर भारतातील (northern India) अनेक राज्यांमध्ये काल मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यात संध्याकाळी पुन्हा ढगफुटी झाली. हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh)अख्खा डोंगरच खाली आला. राजस्थानमध्ये राष्ट्रीय महामार्ग वाहून गेल्याची घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. एसडीआरएफ (SDRF)आणि एनडीआरएफची (NDRF)पथके घटनास्थळी पोहोचून बचावकार्य करत आहेत.(Cloudburst Hits Uttarkashi)
उत्तरकाशी जिल्ह्यात धाराली दुर्घटनेनंतर (Dharali incident) नौगाव येथे ढगफुटी झाली. यामध्ये बाजारपेठ, डझनभर घरे आणि रस्ते पाण्याखाली गेले. पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड घरात शिरल्याने स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.
हिमाचल प्रदेशात या पावसाळ्यात पूर, ढगफुटी आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यू तर ४६ जण बेपत्ता झाले आहेत. सिरमौर जिल्ह्यातील नौहराधर येथे एक पूर्ण डोंगर नदीत कोसळला. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही वस्ती नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही.
राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील रिचेड भागात मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग-१६२ चा अर्धा भाग वाहून गेला. उदयपूरमध्ये आय्याड नदीला पूर आल्याने अनेक नागरिकांना घरांच्या छतांवर आसरा घ्यावा लागला. उत्तर प्रदेशातही पूरस्थिती गंभीर आहे. शाहजहांपूरमध्ये दिल्ली-लखनऊ महामार्ग पाण्याखाली गेला. प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नद्यांची पातळी पुन्हा वाढत आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानसाठी रेड अलर्ट, गोव्यासाठी ऑरेंज अलर्ट आणि २० राज्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तर नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
ओबीसींच्या विरोधात जरांगेंच्या समर्थकाचा कोर्टात कॅव्हेट दाखल
देशभर मतदार यादी पडताळणी १० सप्टेंबरला आयोगाची बैठक
पुण्याची विसर्जन मिरवणूक रेंगाळण्याची परंपरा कायम ! 32 तासांनंतर सांगता