Vaibhav Khedekar to Join BJP? – मनसेतून (MNS)हकालपट्टी झालेले खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांचा उद्या भाजपात प्रवेश होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या (BJP) मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan)यांच्या उपस्थितीत होणा-या या प्रवेश सोहळ्यास माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे, मत्यव्यवसाय मंत्री नितीश राणे यांचीही विशेष उपस्थिती राहील, अशी माहिती आहे.
यापूर्वी खेडेकरांच्या भाजप पक्ष प्रवेशासाठी ४ सप्टेंबर ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी हा पक्ष प्रवेश पुढे ढकलण्यात आल्याने उद्या तरी खेडेकरांचा भाजप प्रवेश होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत खेडकर यांची २५ ऑगस्ट रोजी मनसेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
गाडी सजली, प्रवेश लांबला
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातील मुद्द्यामुळे वातावरण संवेदनशील आहे. यामुळेच आपल्या भाजपा प्रवेशाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचा खुलासा तेव्हा खेडेकरांनी केला होता.कोकणात खेडेकर यांचा पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात साजरा होणार होता.
कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी केलेली खास वाहन सजावट चर्चेचा विषय ठरली. या वाहनावर कोकणचा ढाण्या वाघ माननीय वैभव खेडेकर यांचा जाहीर प्रवेश असे लिहिले होते . त्यावर खेडेकर यांचा फेटा घातलेला फोटो आणि भाजपाचे पक्षचिन्ह ठळकपणे झळकत होते.
रामदास कदमांना आव्हान
भाजपची खेळी (Challenge to Ramdas Kadam)
खेड-दापोलीच्या राजकारणात शिवसेना(शिंदे) गटाचे नेते रामदास कदम आणि खेडेकर हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. खेडेकरांना भाजपात घेऊन माजी मंत्री रामदास कदम यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची खेळी भाजपतर्फे खेळली जात आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मनसेच्या खेडेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शासकीय निधी दिला गेला. पण सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला निधी मिळत नसल्याची जाहीर तक्रार रामदास कदम यांनी तेव्हा केली होती.
खेड नगरपालिकेत त्यांची एकेकाळी एकहाती सत्ता होती. त्यांची ही सत्ता गेल्यानंतर गेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी अफक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते नगराध्यक्ष निवड़ून आले. मात्र त्यांच्या समर्थकांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. याच काळात त्यांच्या अनेक विश्वासू कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गटासह अन्य पक्षांमध्ये प्रवेश केला.
भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप (Corruption Allegations)
नगराध्यक्ष पदाची त्यांची मुदत संपल्यावर त्यांच्यावर २० हून अधिक प्रकरणी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते. काही प्रकरणी त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. तसेच त्यांना न्यायालयाने नगरपालिकेची निवडणूक लढण्यास मनाई केली होती. रामदास कदम यांनीही त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
हे देखील वाचा –
उत्तर प्रदेशमध्ये जातींवर आधारित राजकीय मोर्चे काढण्यावर बंदी
क्लबमध्ये मुलींसाठी सुविधा हव्यात!सचिन तेंडुलकर यांचे आवाहन
लॅपटॉपवर तब्बल 30 हजारांची सूट, Flipkart च्या सेलमध्ये धमाकेदार डील