Home / News / माधुरीला नांदणीला पाठवण्यासाठी वनताराचीही सहकार्याची तयारी

माधुरीला नांदणीला पाठवण्यासाठी वनताराचीही सहकार्याची तयारी

मुंबई – कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी (nandani) येथील महादेवी मठातील महादेवी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाने (suprim court) दिलेल्या आदेशानंतर वनतारामध्ये...

By: Team Navakal
https://www.navakal.in/uncategorized/vantara-is-also-ready-to-cooperate-in-sending-madhuri-to-nandani-marathi-news/

मुंबई – कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी (nandani) येथील महादेवी मठातील महादेवी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाने (suprim court) दिलेल्या आदेशानंतर वनतारामध्ये नेण्यात आले होते. या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्यात चर्चा झाली. वनताराने सकारात्मक भूमिका घेत न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

याबाबत देवेंद्र फडणवीस एक्स पोस्ट करत म्हणाले की, महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले. महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नव्हता.नांदणी मठाजवळ वन विभागाने निवडलेल्या जागेवर या हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या