Home / News / Voter List Drive : देशभर मतदार यादी पडताळणी १० सप्टेंबरला आयोगाची बैठक

Voter List Drive : देशभर मतदार यादी पडताळणी १० सप्टेंबरला आयोगाची बैठक

Voter List Drive

Nationwide Voter List Verification ! EC Meeting on Sept 10

Voter List Drive Ahead – देशातील आगामी निवडणुकांची पारदर्शकता व विश्वासार्हता वाढवण्यासाठी निवडणूक आयोग (Election commission)मतदार यादी पडताळणीच्या (SIR) विशेष मोहिमेची तयारी करत आहे. (Nationwide Voter Roll Audit)यासंदर्भात १० सप्टेंबर रोजी दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.


या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीत या मोहिमेच्या अंमलबजावणीसंबंधी धोरण निश्चित केले जाणार आहे. याआधी बिहारमध्ये एसआयआर राबवले होते. या राज्यात एका महिन्यात सुमारे ३ कोटी मतदारांची पडताळणी झाली होती. मतदार यादी अद्ययावत करणे, मृत, स्थलांतरित किंवा परदेशी नागरिकांची नोंदणी काढून टाकणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आयोगाच्या माहितीनुसार, ही प्रक्रिया वर्षाअखेरीस देशभरात सुरू होण्याची शक्यता आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी आणि केरळ विधानसभा निवडणुकांपूर्वी ही यादी अद्ययावत केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी आयोगाने दोन मार्ग सुचवले आहेत. एक बूथ अधिकारी घरोघरी जाऊन तपासणी करतील तर दुसरा नागरिक आयोगाच्या वेबसाइटवरून अर्ज भरू शकतील.


दरम्यान, बिहारमध्ये या मोहिमेला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला होता. राहुल गांधींनी या मोहिमेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत बिहार मॉडेलद्वारे निवडणुका चोरीचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप केला होता. संसदेतही यावरून मोठा गदारोळ झाला होता.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

व्हिएतनामच्या कंपनीची भारतात एन्ट्री, लाँच केल्या दोन दमदार इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किंमत

पुण्याची विसर्जन मिरवणूक रेंगाळण्याची परंपरा कायम ! 32 तासांनंतर सांगता

ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्गाला मंजुरी; प्रवास फक्त 30 मिनिटांत, पण टोल 365 रुपये