दुसऱ्या राज्यात मराठी भाषिकांना मारले तर ? हिंदुस्तानी भाऊचा सवाल

What if Marathi speakers are attacked in other states? – Hindustani Bhau

What if Marathi speakers are attacked in other states? – Hindustani Bhau

मुंबई – महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात मराठी माणसाला भाषेवरून मारले तर ? (Hindustani Bhau statement)असा सवाल सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्तानी भाऊने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना व्हिडीओच्या माध्यमातून केला. मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेचा (Regional language conflict India)अपमान केल्याने एका रेस्टॉरंट मालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून मनसे आणि राज ठाकरेंना आपल्याच हिंदू लोकांना मारू नका अशी विनंती केली. हिंदुस्तानी भाऊ व्हिडीओत म्हणाला की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन महाराष्ट्रात मराठी भाषा केवळ गर्वच नाही तर माज आहे. परंतु मराठी भाषेवरून येथे आलेल्या हिंदुस्तानातीलच आपल्या हिंदू लोकांना मारणे चुकीचे आहे. शाळा असो किंवा कॉलेज तेथे मराठी भाषा शिकवलीच पाहिजे. त्यासाठी जेवढी ताकद तुम्हाला लावायची ती लावा, संपूर्ण हिंदू समाज तुमच्यासोबत आहे. पण, गोरगरिबांना मारणे चूक आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मराठी लोक दुसऱ्या राज्यात शिकतात आणि नोकरी करतात. तेथील लोक आपल्या लोकांना झालेली मारहाण बघतात. जर त्या लोकांनी तेथे मराठी लोकांसोबत असे केले तर आपण काय करणार? एखाद्याला मारणे खूप सोपे असते पण एकत्र आणणे अवघड असते.(Hindi-Marathi language tension)
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांची एक सावली म्हणून तुमच्याकडे सामान्य जनता बघते. यामुळे हिंदू लोक तुमच्यापासून लांब जात आहेत. राजकारण करा पण आज तुम्ही राजकारण कोणासोबत करत आहे ? ज्या लोकांनी बाळासाहेबांचा सन्मान केला नाही, काँग्रेससोबत ज्यांनी युती केली, जे श्रीरामांबद्दल चुकीचे बोलले, त्यांच्यासोबत तुम्ही युती करणार का? हिंदू समाज तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघतो आहे. त्यांचा विश्वास तोडू नका. संपलेला पक्ष असे ते तुम्हाला बोलले. मी मनसैनिकांनाही विनंती करतो की, ते सुद्धा हिंदू आहेत, त्यांना मारू नका.