Home / News / Oldest Marathon Runner Fauja Singh Dies – पंजाबचे ११४ वर्षीय धावपटू फौजा सिंग यांचे अपघाती निधन

Oldest Marathon Runner Fauja Singh Dies – पंजाबचे ११४ वर्षीय धावपटू फौजा सिंग यांचे अपघाती निधन

चंदीगड – पंजाबचे ११४ वर्षीय (114-year-old )धावपटू फौजा सिंग (Fauja Singh)यांचे काल अपघाती निधन झाले. पंजाबमधील जालंधर येथील सिंग यांच्या...

By: Team Navakal
Oldest Marathon Runner Fauja Singh Dies

चंदीगड – पंजाबचे ११४ वर्षीय (114-year-old )धावपटू फौजा सिंग (Fauja Singh)यांचे काल अपघाती निधन झाले. पंजाबमधील जालंधर येथील सिंग यांच्या राहत्या घराबाहेर त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक (road accident)दिली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर संपूर्ण क्रीडा विश्वातील लोक आणि त्यांचे चाहते दुःख व्यक्त करत आहेत.

फौजा सिंग यांचा जन्म (born) १९११ साली जालंधर जिल्ह्यातील बियास पिंड येथे झाला. त्यांनी वयाच्या ९० व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅरेथॉन (marathon runner)धावण्यास सुरुवात केली आणि स्पर्धा पूर्ण देखील केली. कठोर परिश्रम आणि धैर्यामुळे त्यांना ‘टर्बन टॉर्नाडो’ म्हणून प्रसिद्धी मिळाली २००४ मध्ये त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी लंडन मॅरेथॉन पूर्ण केली. २०११ मध्ये म्हणजेच १०० व्या वर्षी त्यांनी टोरंटो मॅरेथॉन पूर्ण केली आणि १००+ श्रेणीमध्ये विक्रम बनवला. ते आतापर्यंतचे सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आरोग्य, सहनशक्ती आणि सकारात्मक विचारसरणीचे उदाहरण मांडले. जालंधर पोलिसांनी त्यांच्या अपघाताचा तपास सुरु केला आहे. अज्ञात वाहन आणि चालकाचा शोध सुरू आहे. जालंधर प्रशासनाने सिंग यांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या