Yugendra – Tanishqa युगेंद्र – तनिष्काचा मुंबईतील घरीसाखरपुडा! पवार कुटुंब उपस्थित

Yugendra and Tanishka's engagement ceremony in Mumbai! Pawar family present

Yugendra and Tanishka’s engagement ceremony in Mumbai! Pawar family present

मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू (Sharad Pawar grandson)आणि श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांचा आज तनिष्का कुलकर्णी(Yugendra Pawar- Tanishka Kulkarni engagement) हिच्यासोबत साखरपुडा सोहळा पार पडला. मुंबईतील प्रभादेवी येथील इंडियाबुल्स इमारतीतील कुलकर्णी यांच्या घरी हा समारंभ झाला. या कौटुंबिक सोहळ्यासाठी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे सहकुटुंब उपस्थित होते.(महाराष्ट्रा पवार फमिली )

एप्रिल महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar family)यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा पुण्यात थाटामाटात पार पडला होता. त्यानंतर आज पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले. या सोहळ्यासाठी युगेंद्र पवार यांनी गुलाबी रंगाचा सदरा आणि जॅकेट घातले होते तर तनिष्काने गुलाबी साडी नेसली होती. या सुंदर जोडीचे फोटोही आता माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची साथ देत राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. . शरद पवार यांच्या पक्षाकडून त्यांना विधानसभेची उमेदवारीही मिळाली होती. या निवडणुकीत काका अजित पवार यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. युगेंद्र पवार हे सध्या राजकारणात सक्रिय आहेत. तर तनिष्का कुलकर्णी या उद्योगपतीच्या कन्या आहेत.