श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पोलीस महासंचालक पदी आयपीएस अधिकारी नलीन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीश कुमार यांची सीआयडीच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. त्या आधीच जम्मू काश्मिरमधील तब्बल १९८ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने नलीन प्रभात यांची पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली असली तरी ते १ ऑक्टोबर रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. तो पर्यंत ते जम्मू काश्मिरच्या विशेष महासंचालक पदाचा कारभार पाहतील. जम्मू काश्मीरमधील ५ उपायुक्त, ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. या बरोबरच अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
