पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २५ ऑगस्टला जळगाव दौरा

जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ ऑगस्टला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा पहिलाच जळगाव दौरा असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व आहे. या दौऱ्यादिवशी नरेंद्र मोदी यांची जळगावात जाहीर सभा पार पडणार आहे यावेळी ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ही सभा जळगाव विमानतळावरील मैदानात पार पडणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी काल तयारीसाठी मैदानाची पाहणी केली.