मुंबई – वांद्रे येथील लीलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टमधील ११.५२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. हा एफआयआर वांद्रे पोलीस स्थानकात सुपूर्द करण्यात आला आहे. ट्रस्टचे तत्कालीन विश्वस्त प्रशांत किशोर मेहता (५३) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. लीलावती ट्रस्टशी संबंधित हा तिसरा एफआयआर आहे.
या तक्रारीत आरोपी रश्मी मेहता, निकेत मेहता, सुशील मेहता, भाविन मेहता, चेतन मेहता आणि सुरेश मोटवानी यांनी ऑगस्ट २००१ ते जून २००३ या कालावधीत ट्रस्टमधील निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे. या कालावधीत आरोपींनी व्यवहारांची नोंद न करता ट्रस्टच्या पैशांपैकी १६.५२ कोटी रुपये मेफेअर रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि वेस्टा इंडिया लिमिटेडमध्ये गुंतवले. एकूण गुंतवणुकीपैकी ₹११.५२ कोटी रुपयांचा रोख रकमेत व्यवहार करण्यात आला आणि ते ट्रस्टच्या अधिकृत खात्यात कधीच दाखवण्यात आले नाहीत असा आरोप आहे. यामुळे ट्रस्टचे मोठे आर्थिक नुकसान झाले.आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून येत्या काही दिवसांत आरोपींना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.