रियाध-सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये सध्या ई स्पोर्टस् म्हणजे व्हिडीओ गेमची विश्वकप स्पर्धा सुरू असून ती २५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत २१ विविध व्हिडिओ गेम प्रकारातील २२ स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी यंदा ६० दशलक्ष डॉलर्स किमतीचे विविध पुरस्कारही ठेवण्यात आले आहेत. व्यक्तिगत व क्लब पातळीवरही स्पर्धा होणार असून एकाच खेळाडूकडून दोन विविध ई खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंनाही विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत.
