ह्युस्टन – अमेरिकेच्या टेक्सास शहरात उभारण्यात आलेल्या ९० फुटी हनमान मूर्तीचे नुकतेच अनावरण करण्यात आले. काही मैल अंतरावरून पाहता येईल एवढी उंच असलेली ही शिल्पकृती अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिल्प आहे. स्टॅच्यू ऑफ युनियन असे या शिल्पकृतीचे नाव आहे.जगातील उंच शिल्प किंवा पुतळ्यांमध्ये स्टॅच्यू ऑफ युनियनचा समावेश आहे. यासह इतर अनेक विक्रम या शिल्पाच्या नावे आहेत. भारताबाहेर उभारण्यात आलेली सर्वात उंच हनुमान मूर्ती अशी ओळखही स्टॅच्यू ऑफ युनियनने मिळविली आहे. टेक्सासमधील हे सर्वात उंच शिल्प ठरले आहे.अमेरिकेतील सर्वात उंच शिल्प स्टॅच्यू ऑफ लिबर्टी (१५१ फूट) आणि फ्लोरिडातील पेगासस अँड ड्रॅगन (११० फूट) नंतर स्टच्यू ऑफ युनियन तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिल्प आहे.
