Home / राजकीय / कुर्ल्याच्या मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला

कुर्ल्याच्या मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला

मुंबई -अदानी समूहाकडून राबवल्या धारावी प्रकल्पाला जाणार्या कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.०५ हेक्टर जागा देण्याच्या निर्णय आज सरकारने घेतला. धारावी प्रकल्पाच्या...

By: Team Navakal

मुंबई -अदानी समूहाकडून राबवल्या धारावी प्रकल्पाला जाणार्या कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.०५ हेक्टर जागा देण्याच्या निर्णय आज सरकारने घेतला. धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समूहाला ही जागा देऊ नये, यासाठी काही दिवसांपूर्वी स्थानिकांनी आंदोलन केले होते. हा विरोध डावलून राज्य सरकारने ही जाग अदानी समूहाला दिली आहे. त्यामुळे आता निर्णयावरून वाद होण्याची शक्यता आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावेळी धारावीतील अनेक कुटुंबाचे स्थलांतर करावे लागेल. यासाठी मदर डेअरीची जागा आपल्याला मिळावी, अशी मागणी अदानी समूहाकडून करण्यात आली होती. ही मागणी राज्य सरकारने मान्य करून आज यासंदर्भात निर्णय घेतला.ही जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना मान्यता देण्यात आली आहे. ही जागा धारावी प्रकल्पाला देण्यास स्थानिकांनी विरोध केला होता. या जागेवर बोटॅनिकल गार्डन व्हावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलनही करण्यात आले.

अदानी समूहाला धारावी प्रकल्पासाठी आतापर्यंत मुलुंड, कांजुरमार्ग आणि भांडूप येथील २५६ एकर जागा देण्यात आली आहे.याशिवाय कुर्ला, माटुंगा येथील रेल्वेच्या जमिनीही घेतल्या आहेत. देवनार डम्पिंग ग्राऊंड, मालाडमधील भूखंडाची मागणीही अदानी समूहाने केली आहे. मात्र विरोधकांनी या जमिनी अदानी समूहाला देण्यास विरोध केला आहे.

या निर्णयानंतर गिरीश महाजन म्हणाले की, धारावी पुनर्वसनात कुठलेही नियमबाह्य काम केले जाणार नाही. जागा कमी पडत असेल तर ती शासनाने दिली तर त्यात चुकीचे काय आहे? उद्धव ठाकरेंनी धारावीसाठी तर काही केले नाही. विरोधकांना दुसरा काही कामधंदा नाही.

Web Title:
For more updates: , , , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या