Home / राजकीय / महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करू ठाकरे गटाची भूमिका

महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करू ठाकरे गटाची भूमिका

मुंबई – शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या दिशेने ठाकरे गटाने आज एक पुढचे पाऊल टाकले. महाराष्ट्र...

By: Team Navakal
Who will take responsibility? Sanjay Raut's question


मुंबई – शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या दिशेने ठाकरे गटाने आज एक पुढचे पाऊल टाकले. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत,अशी भूमिका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मांडली.
मराठी माणसाच्या हिताचा विचार घेऊन राज ठाकरे यांनी स्वतंत्र संघटन उभे केले आहे.मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा विचार करणाऱ्या सर्वांनीच आता एकत्र आले पाहिजे. अन्यथा मुंबई आपल्या हातात राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देशासह महाराष्ट्रात अराजक माजवले आहे. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करण्याचे, महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे षडयंत्र त्यांनी रचले आहे. त्यांच्यापासून मुंबई आणि महाराष्ट्र वाचवण्याची गरज आहे.आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्व नेते राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत एका सुरात बोलत आहोत. त्यावर कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही. आमच्या भावना निर्मळ,स्वच्छ आणि स्पष्ट आहेत. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करण्यास तयार आहोत असे राऊत म्हणाले.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या