Home / राजकीय / शरद पवार गटाचा अकोल्याचा नेता अजित पवार गटात जाणार

शरद पवार गटाचा अकोल्याचा नेता अजित पवार गटात जाणार

हिंगोली – आता हिंगोलीच्या राजकारणातही उलथापालथ सुरू झाली आहे.शरद पवार यांचे निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल...

By: Team Navakal

हिंगोली – आता हिंगोलीच्या राजकारणातही उलथापालथ सुरू झाली आहे.शरद पवार यांचे निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पतंगे आता शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.८ जून रोजी ते सेनगाव येथे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.यामुळे शरद पवार गटाला हिंगोलीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे ८ जून रोजी खास हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.यावेळी सेनगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक व ग्रामीण भागातील पदाधिकारीदेखील शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.अनिल पतंगे म्हणाले की,राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांना प्रतिसाद देत आम्ही सर्वजण अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहोत. शरद पवार यांच्यावर आमची कोणतीही नाराजी नाही.कारण निष्ठावंत म्हटल्यावर नाराजी व्यक्त करणे चुकीच आहे.परंतु काळानुसार कार्यकर्त्यांचा आग्रह होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आम्ही हा निर्णय घेतला आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या