Home / राजकीय / BEST Corruption – बेस्ट पथसंस्थेत २४ कोटींचा भ्रष्टाचार ! प्रसाद लाडांचा आरोप

BEST Corruption – बेस्ट पथसंस्थेत २४ कोटींचा भ्रष्टाचार ! प्रसाद लाडांचा आरोप

BJP MLC Prasad Lad

मुंबई – दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (BEST Employees’ Co-operative Credit Society,)पंचवार्षिक निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray)आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी हातमिळवणी केली आहे. उद्या या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच ठाकरे बंधूंना पराभव करण्यासाठी भाजपा मैदानात उतरली आहे.आज आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट पतसंस्थेचे उमेश सारंग (Umesh Sarang)आणि बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत (Suhas Samant) यांनी जवळपास २४ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.

प्रसाद लाड (BJP MLC Prasad Lad)म्हणाले की, बेस्ट सहकारी पतसंस्थेतील भ्रष्टाचार घाग आणि गोरे यांच्या तक्रारीमुळे समोर आला आहे. बंगले खरेदी (bungalows), कार्यालय खरेदी, डिपॉझिट (deposits) किकबॅक घेणे यामुळे प्रथमदर्शी २४ कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचे गुन्हेशाखेच्या निदर्शनास आले आहे. यात सर्व संचालकांची चौकशी होणारच आहे. उमेश सारंग जे पतसंस्थेचे उबाठा सेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे (BEST Workers’ Union) अध्यक्ष सुहास सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे. आर्थिक गुन्हे शाखेने बेस्टच्या २१ संचालकांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे.