पुणे – बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना (Malegaon Cooperative Sugar Factory e)निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर (Neelkantheshwar) पॅनलचे उमेदवार विजयाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे याठिकाणी पुन्हा अजित पवार यांचे वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
२२ जूनला या संस्थेची निवडणूक पार पडली. यामध्ये अजित पवारांचे (Ajit pawar) नीलकंठेश्वर पॅनल, रंजन तावरे यांचे सहकार बचाव पॅनल आणि शरद पवार यांचे बळीराजा सहकार बचाव पॅनल रिंगणात उतरले होते. कालपासून या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. काल ब गटातून अजित पवार विजयी झाले. त्यानंतर त्यांचेच पॅनल आघाडीवर आहे. आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास पुन्हा उर्वरित मतमोजणी सुरु झाली.यामध्ये शरद पवार यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झाले. २१ पैकी २० जागांवर नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर सांगवी गट क्रमांक ३ मध्ये तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे आघाडीवर होते.
